Monday, August 31, 2020

National Housing Bank नॅशनल हाऊसिंग बँक भरती

National Housing Bank नॅशनल हाऊसिंग बँक भरती 2020 : विविध 18 पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 असिस्टंट मॅनेजर
(स्केल-I)
Assistant Manager
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD) साठी.  16 01 ऑगस्ट 2020 रोजी 21 ते 30 वर्षे
फी : General/OBC : 850,   SC/ST/PwBD : 175
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 
अंतिम दिनांक : 18.09.2020

NHM Nashik आरोग्य विभाग नाशिक भरती 2020

The post National Housing Bank नॅशनल हाऊसिंग बँक भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/31Jklkr
via IFTTT

Saturday, August 29, 2020

NHM Nashik आरोग्य विभाग नाशिक भरती 2020

NHM Nashik आरोग्य विभाग नाशिक भरती 2020 : विविध 350 पदांसाठी जाहीर झाली असून थेट मुलाखतीद्वारे पदभरती केली जाणार आहे.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 फिजिशियन
Physician
MD (Medicine) 05 18 ते 38 वर्षे
2 वैद्यकीय अधिकारी
Medical officer
MBBS 23 18 ते 38 वर्षे
3 वैद्यकीय अधिकारी (आयुष)
Medical officer
BAMS/MUMS 114 18 ते 38 वर्षे
4 स्टाफ नर्स
Staff Nurse
GNM किंवा B.Sc (नर्सिंग). 174 18 ते 38 वर्षे
5 लॅब टेक्निशियन
Lab Technician
B.Sc DMLT 34 18 ते 38 वर्षे
फी : फी नाही
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
मुलाखत : दररोज सकाळी 10:00 AM ते 12:00 PM
मुलाखतीसाठी पत्ता : शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

NFL Recruitment नॅशनल फर्टिलायझर्स लि. भरती

The post NHM Nashik आरोग्य विभाग नाशिक भरती 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2QBI3Zi
via IFTTT

NFL Recruitment नॅशनल फर्टिलायझर्स लि. भरती

NFL नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2020 : विविध 40 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज पोस्टाच्या साहाय्याने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
इंजिनिअर
Engineer
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून 60% गुणांसह B. Tech./B.E./B.Sc.Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/E&C/I&E/E&E/सिव्हिल) किंवा B.Tech./B.E. (फायर & सेफ्टी) 26 30 वर्षांपर्यंत
मॅनेजर
Manager
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) किंवा AMIE 
संबंधित क्षेत्रातील 09 वर्षे अनुभव
14 45 वर्षांपर्यंत
फी : General/OBC : 700,   SC/ST/PwBD/ExSM : फी नाही
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्जाची प्रत : येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता   : Chief Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301
अंतिम दिनांक : 25.09.2020

(Central Railway) मध्य रेल्वे भरती 2020

The post NFL Recruitment नॅशनल फर्टिलायझर्स लि. भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2Qxpt4H
via IFTTT

Thursday, August 27, 2020

(Central Railway) मध्य रेल्वे भरती 2020

(Central Railway) मध्य रेल्वे भरती 2020 : मध्ये पॅरामेडिकल स्टाफ पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज इमेलद्वारे स्वीकारले जाणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
स्टाफ नर्स
Staff Nurse
GNM किंवा B.Sc (नर्सिंग)  26 20 ते 40 वर्षे
फार्मासिस्ट
Pharmacist
12वी (विज्ञान) उत्तीर्ण  
D.Pharm
03 20 ते 35 वर्षे
लॅब टेक्निशियन
Lab Technician
B.Sc  
DMLT
10 18 ते 33 वर्षे
एक्स-रे टेक्निशियन
X ray Technician
12वी(PC)उत्तीर्ण
रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निशियन/ रेडिओडायग्नोसिस टेक्नोलॉजी डिप्लोमा.
09 19 ते 33 वर्षे
एकूण पदसंख्या 48
फी  :  फी नाही `
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी email ID : persbrbsl@gmail.com
अंतिम दिनांक : 02.09.2020

Film and Television Institute Pune 2020

The post (Central Railway) मध्य रेल्वे भरती 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3b9wcva
via IFTTT

Film and Television Institute Pune 2020

Film and Television Institute Pune 2020 : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे विविध 13 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  पदसंख्या 
1 प्रोफेसर सिनेमॅटोग्राफी
Professor Cinematography
01
2 सहाय्यक प्राध्यापक छायांकन
Assistant Professor Cinematography
01
3 सहयोगी प्राध्यापक इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी
Associate Professor Electronic Cinematography
01
4 सहयोगी प्राध्यापक मार्गदर्शन
Associate Professor Direction
02
5 सहाय्यक प्राध्यापक मार्गदर्शन
Assistant Professor Direction
02
6 असोसिएट प्रोफेसर आर्ट डायरेक्शन
Associate Professor Art Direction
02
7 सहाय्यक प्राध्यापक पटकथा लेखन
Assistant Professor Screenplay Writing
02
8 सहाय्यक प्राध्यापक संपादन
Assistant Professor Editing
02

वयोमर्यादा : ऑक्टोबर 2020 पर्यंत 63 वर्षे

अर्हता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था कडून संबंधित विषयात पदवी किंवा पदविका किंवा समकक्ष.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी.
निवड प्रक्रिया : केवळ ऑनलाइन मुलाखत. या मुलाखतीच्या फेरीमध्ये निवड झालेले नाही अश्या उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

महत्त्वाच्या दिनांक :

  • अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक : 09.09.2020 (संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत)
  • पात्र उमेदवारांची यादी प्रकाशनाची दिनांक : 22.09.2020
  • ऑनलाईन मुलाखतीची तात्पुरती दिनांक 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2020.
फी  :  फी नाही `
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

NHPC Limited Recruitment 2020

The post Film and Television Institute Pune 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3gzoOdF
via IFTTT

Wednesday, August 26, 2020

NHPC Limited Recruitment 2020

NHPC Limited Recruitment 2020 : राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ मर्यादितमध्ये विविध 86 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज दिनांक 29.08.2020 रोजी पासून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)
Trainee Engineer (Civil)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) 30 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे 
2 ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल)
Trainee Engineer (Mechanical)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) 21 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे 
3 ट्रेनी ऑफिसर (HR)
Trainee Officer (HR)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य 05 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे 
4 ट्रेनी ऑफिसर (लॉ)
Trainee Officer (Law)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह विधी पदवी. 08 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे 
5 ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)
Trainee Officer (Finance)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर  CA/ICWA/CMA 22 01 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे 
एकूण पदसंख्या 86
फी  :  फी नाही `
अंतिम दिनांक : 29.09.2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

NTPC Recruitment 2020

The post NHPC Limited Recruitment 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3gx7hT6
via IFTTT

NTPC Recruitment 2020

NTPC Recruitment 2020 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध 60 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 मेडिकल स्पेशलिस्ट
Medical Specialist
MBBS MD/MS in Medicine/ O&G/ Pediatrics. 23 37 वर्ष  
2 मेडिकल 
(GDMO)
Medical Officer
MBBS
संबंधित क्षेत्रातील 02 वर्षे अनुभव.
37 37 वर्ष 
एकूण पदसंख्या 60

फी : General/OBC/EWS : 300/- SC/ST/PWD/ExSM : फी नाही

वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 
अंतिम दिनांक : 02.09.2020

Cochin Shipyard Graduate Technician 2020

The post NTPC Recruitment 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3llvlfy
via IFTTT

Tuesday, August 25, 2020

Cochin Shipyard Graduate Technician 2020

Cochin Shipyard Graduate Technician 2020 : कोचिन शिपयार्ड मध्ये विविध 139 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 पदवीधर अप्रेंटिस
Graduate Apprentices
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कॉम्पुटर/IT/सेफ्टी/मरीन/नेव्हल आर्किटेक्चर आणि  शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग पदवी. 67 अप्रेंटीशीप नियमानुसार  
2 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
Technician (Diploma) Apprentices
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून  इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/कॉम्पुटर/कमर्शिअल प्रॅक्टिस इंजिनिअरिंग डिप्लोमा. 72 अप्रेंटीशीप नियमानुसार
एकूण पदसंख्या 139
फी : फी नाही
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 
अंतिम दिनांक : 08.09.2020

नोकरी शोधताय? Google Kormo Jobs करील मदत.

The post Cochin Shipyard Graduate Technician 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3hxDzig
via IFTTT

नोकरी शोधताय? Google Kormo Jobs करील मदत.

गूगल चं बहुचर्चित Kormo Jobs ॲप भारतात सादर!

बुधवार 19 ऑगस्ट रोजी गुगलने त्यांचं बहुचर्चित Kormo Jobs App भारतात लॉन्च केलं. या ॲप्लिकेशन मुळे नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी शोधणं आणि अर्ज करणं सोपं होईल.

Kromo Jobs एप्लीकेशन गुगलने 2018 मध्ये बांगलादेश मध्ये लॉन्च केलं होतं त्यानंतर हे ॲप इंडोनेशियात लॉंच केलं. गेल्याच वर्षी गुगल पे मध्ये जॉब स्पॉट या नावाने यातली काही फीचर्स देण्यात आली होती. मात्र आता फॉर्म अधिकच्या फीचर्स सह Kromo Jobs हे वेगळं ॲप लॉन्च करण्यात आलं आहे.

या ॲप मध्ये लोकेशन नुसार नोकरीचा शोध, रियल टाइम ट्रॅकिंग, इन-ॲप मुलाखत शेड्युल करणे, बायोडेटा बनवणे आणि कौशल्य विकासासाठी साधनं अशा विविध सोयी आहेत.

Zomato आणि Dunzo सारख्या कंपन्यांनी 20 लाखांहून अधिक नोकऱ्या Kormo वर पोस्ट केल्या आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासह एकूण दहा शहरांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी हे ॲप उपलब्ध आहे.

आज आपण हे ॲप कसे वापरावे याची माहिती मिळवूया 

  1. Kormo Jobs ॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
  2. एकदा हे ॲप इन्स्टॉल झाले की उघडल्यावर तुम्हाला तुमचा Gmail अकाउंट निवायचा आहे.
  3. त्यानंतर तुमच्या कामाशी/शिक्षणाशी संबंधित क्षेत्र निवडून Continue करायचे आहे.
  4. आता लगेच तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नोकरीच्या उपलब्ध असलेल्या संधींबद्दल एक लिस्ट दिसेल. यात तुम्ही निवडलेल्या एकापेक्षा जास्त क्षेत्राचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले दिसेल. पण लगेच आपण आपल्याला आवडलेल्या नोकरीसाठी अर्ज न करता पुढील गोष्टींची पूर्तता केल्यास नक्कीच फायदा होईल.
  5. स्क्रीनवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या Your Profile या बटनावर टॅप करून आपण आधी आपले प्रोफाइल म्हणजेच शैक्षणिक व व्यावसायिक तपशील भरायचे आहेत.
  6. तुमचे रेझ्युमे बनवलेले असेल तर तुम्ही इथे अपलोड करू शकता. हे ॲप आपोआप तुमचे तपशील प्रोफाइलमध्ये अंतर्भूत करेल किंवा तुम्ही स्वतःही हे तपशील भरू शकता.
  7. सर्वप्रथम Add work experience या विभागात आपण याआधी केलेल्या कामांचा/नोकऱ्यांचा तपशील व्यवस्थित भरा.
  8. त्यानंतर Add education या विभागात आपले पूर्ण शैक्षणिक तपशील भरा. 
  9. आता तुमची सर्व माहिती भरून झाली असेल तर नोकऱ्यांच्या यादीतील तुम्हाला योग्य वाटणाऱ्या नोकरीच्या पर्यायाला निवडा. इथे तुम्हाला त्या नोकरीसंदर्भात  पूर्ण माहिती मिळेल. आणि त्याखाली Apply हे बटन दिसेल. या बटनाला टॅप केले की त्या नोकरीसाठी तुमचा अर्ज संबंधित कार्यालयाला गेलेला असेल. यापुढील कार्यवाही संबंधिक कार्यालयाकडून केली जाईल.

The post नोकरी शोधताय? Google Kormo Jobs करील मदत. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3lgnv6R
via IFTTT

Monday, August 24, 2020

Forest Research Institute Recruitment 2020

Forest Research Institute Recruitment : वन अनुसंधान संस्थेत विविध 107 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत.

क्र पदाचे नाव अर्हता पदसंख्या वयोमर्यादा
1 ग्रंथालय
माहिती
सहाय्यक
Library
Information
Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्स मध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त. 01 18 ते 27 वर्षे
2 तांत्रिक
सहाय्यक
Technical
Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्र / प्राणीशास्त्र / वायुवीजन / पर्यावरणशास्त्र /
इकोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / जननशास्त्र / मायक्रोबायोलॉजी / भौतिकशास्त्र /अभियांत्रिकी / विज्ञान / सांख्यिकीमध्ये पदवी
62 21 ते 30 वर्षे
3 स्टेनो ग्रेड -2
Steno Grade-II
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण.
इंग्रजी / हिंदी स्टेनोग्राफीमध्ये प्रति मिनिट 80 शब्द
किमान असणे आवश्यक आहे
04 21 ते 30 वर्षे
4 मल्टी टास्किंग
कर्मचारी
Multi Tasking
Staff
मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
संबंधित क्षेत्रातील 3 वर्ष अनुभव.
40 18 ते 27 वर्षे
एकूण पदसंख्या 107
अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2020 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.
जाहिरात येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा.
फी : General/OBC/EWS : 700, SC/ST/PWD/महिला : 30

(ECIL Recruitment) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती



from WordPress https://ift.tt/31nxCPn
via IFTTT

10th Diploma Admission दहावी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया

शैक्षणिक वर्ष 2020 – 21 करिता दहावीच्या पात्रतेवर आधारित डिप्लोमाची प्रवेश प्रकिया तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत सुरु झाली आहे.

प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा.



from WordPress https://ift.tt/2Qj29Yd
via IFTTT

(National seed corporation Recruitment) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती(मुदतवाढ)

(National seed corporation Recruitment) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती विविध 220 पदांसाठी जाहीर झाली आहे. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
असिस्टंट (assistant) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची व्यावसायिक पदवी. मध्ये कायदेशीर बाबी हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव. ०३ ३0 वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनीManagement Trainee (Production)   B.Sc (अ‍ॅग्री.) / MBA (अ‍ॅग्री. बिझिनेस मॅनेजमेन्ट) किंवा M.Sc.मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडील अ‍ॅग्रोनॉमी / बियाणे तंत्रज्ञान / वनस्पती संवर्धन आणि अनुवंशशास्त्रकिमान 60% गुण. संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे १६ २७ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनीManagement Trainee (Horticulture)   60% गुणांसह B.Sc (हॉर्ट.)/ MBA (अ‍ॅग्री. बिझिनेस एमजीटी.) किंवा M.Sc. (फलोत्पादन) / M.Sc. (अ‍ॅग्री.) मध्ये विशेषज्ञतेसहमान्यताप्राप्त विद्यापीठातील फलोत्पादन पदवी. ०१ २७ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनीManagement Trainee (Marketing) 60% गुणांसह B.Sc. (अ‍ॅग्री.) /MBA(एमकेटीजी. / अ‍ॅग्री. बिझिनेस मॅनेजमेंट) पूर्ण वेळ किंवा दोन वर्षे पूर्ण वेळ PG विपणन / अ‍ॅग्री. मध्ये पदवी / पदविका. व्यवसाय व्यवस्थापन किंवा M.Sc. (अ‍ॅग्री.)संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०७ २७ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनीManagement Trainee (Human Resource)  60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc./M.Sc. (कृषी/बागकाम), MBA/ PG डिप्लोमा/पदवी (कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध/कामगार कल्याण/मानव संसाधन व्यवस्थापन /विपणन /कृषीव्यवसाय) ०२ २७ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनीManagement Trainee (Agri. Engg.)   60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची BE/B.Tech (Agri. Engg) संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०४ २७ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनीManagement Trainee (Civil Engg.)   60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची BE/B.Tech (Civil Engg) संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे.  ०१ २७ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनीManagement Trainee (Qualiff Control)   60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची M.Sc.(Agri.)Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०२ २७ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनी  (Materials Management) (CPM) (Agro Chemicals)  60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची B.Sc (Agri.) सोबत MBA (Agri. Business Management) संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०३ २७ वर्षांपर्यंत
१० सिनियर ट्रेनीSr. Trainee (Agriculture)  60 % गुणांसह M.Sc.कृषी मध्ये Agronomy/Seed Tech./Plant Breedingसंगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे २९ २७ वर्षांपर्यंत
११ सिनियर ट्रेनीSr. Trainee (Agriculture) – Plant Protection (PP) 55% गुणांसह M’Sc.(Agri) Plant Pathology किंवा Agriculture Entomology .संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०१ २७ वर्षांपर्यंत
१२ सिनियर ट्रेनीSr. Trainee (Horticulture) 55% गुणांसह M.Sc. (Hort.) /M’Sc.(Agri) Horticulture मधे . संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे.  ०१ २७ वर्षांपर्यंत
१३ सिनियर ट्रेनीSr. Trainee (Marketing) 55 % गुणांसह B.Sc./M.Sc. (कृषी)/MBA (HR)/ MBA/ PG डिप्लोमा/पदवी (औद्योगिक संबंध / कर्मचारी व्यवस्थापन / कामगार कल्याण)/M.Com  १० २७ वर्षांपर्यंत
१४ सिनियर ट्रेनीSr. Trainee (Humair Resource)  55 % गुणांसह B.Sc./M.Sc. (कृषी)/MBA (HR)/ MBA/ PG डिप्लोमा/पदवी (औद्योगिक संबंध / कर्मचारी व्यवस्थापन / कामगार कल्याण)/M.Com  ०५ २७ वर्षांपर्यंत
१५ सिनियर ट्रेनीSr. Trainee (Logistics)  MBA (Materials Management/Logistics & Supply Chain Management) किंवा B.Sc (अ‍ॅग्री.) मध्ये MBA (अ‍ॅग्री. बिझिनेस मॅनेजमेन्ट)  ०५ २७ वर्षांपर्यंत
१६ सिनियर ट्रेनीSr. Trainee (Quality Control)  60 % गुणांसह B.Sc.कृषी मध्ये Agronomy/Seed Tech./Plant Breedingसंगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०१ २७ वर्षांपर्यंत
१७ सिनियर ट्रेनीSr. Trainee (Accounts) 55 % गुणांसह M.com/ MBA पदवी.संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे ०५ २७ वर्षांपर्यंत
१८ डिप्लोमा ट्रेनीDiploma Trainee (Agriculture Engineering) 55 % गुणांसह कृषी डिप्लोमा.संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे  ०४ २७ वर्षांपर्यंत
१९ डिप्लोमा ट्रेनीDiploma Trainee (Electrical Engineering) 55 % गुणांसह कृषी/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे ०३ २७ वर्षांपर्यंत
२० ट्रेनीTrainee (Agriculture) 60 % गुणांसह B.Sc. (कृषी) संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. १८ २७ वर्षांपर्यंत
२१ ट्रेनीTrainee (Marketing) 60 % गुणांसह B.Sc. (कृषी) संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे.. १७ २७ वर्षांपर्यंत
२२ ट्रेनीTrainee (Human Resource) मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदवीधरइंग्रजीमध्ये 30 wpm गतीसह संगणक टाइपिंग. हिंदी टायपिंग (25 wpm) चे ज्ञान आवश्यक  आहे ०८ २७ वर्षांपर्यंत
२३ ट्रेनीTrainee (Agri. Stores) 60 % गुणांसह B.Sc. (कृषी) संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०६ २७ वर्षांपर्यंत
२४ ट्रेनीTrainee (Purchase) 60 % गुणांसह B.Sc. (कृषी) संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०२ २७ वर्षांपर्यंत
२५ ट्रेनी(Technician):  60 % गुणांसह  ITI प्रमाणपत्र NCVT सहित Diesel Mechanic,TractorMechanic,Electrician,Welder,Auto Electrician,Fitter,Froger and Heat Trear.  २७ २७ वर्षांपर्यंत
२६ ट्रेनी(Stores Engineering)  60 % गुणांसह B.Sc. (कृषी)/ ITI प्रमाणपत्र NCVT सहित Fitter, Diesel Mechanic & TractorMechanic.trade ०९ २७ वर्षांपर्यंत
२७ ट्रेनी(Stenographer)  60 % गुणांसह B.Sc. (कृषी)/ ITI/ BCA/ B.Sc. (कॉम्पुटर सायन्स/IT) /डिप्लोमा.उमेदवारास इंग्रजी व संगणकात 80 wpm वेगाने शॉर्टहँड टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.इंग्रजीमध्ये अनुक्रमे 30 wpm च्या वेगाने टायपिंग चाचणी. शॉर्टहँड चाचणी आणि संगणक टाइपिंग चाचणी. १३ २७ वर्षांपर्यंत
२८ ट्रेनी(Quality Control) 60 % गुणांसह B.Sc. (कृषी)संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०३ २७ वर्षांपर्यंत
२९ ट्रेनी(Data Entry Operator)  60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची BCA/ B.Sc. (कॉम्पुटर सायन्स/IT) /डिप्लोमा. ०३ २७ वर्षांपर्यंत
३० ट्रेनी(Accounts)  60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची B.com पदवी .संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे. ०६ २७ वर्षांपर्यंत
३१ ट्रेनीTrainee Mate (Agri.)  इंटरमीडिएट एग्रीकल्चरमध्ये /विज्ञान जीवशास्त्र विषयासह उच्च माध्यमिक परीक्षा पास. ०३ २५ वर्षांपर्यंत
एकूण पदसंख्या  २२०
वेबसाईट : येथे क्लिक करा
(National seed corporation Recruitment) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती जाहिरात : येथे क्लिक करा
अंतिम दिनांक : 04 ऑगस्ट 2020  31 ऑगस्ट 2020
फी  :  SC/ST/PWD: फी नाही , General/OBC/ExSM: 500/-



from WordPress https://ift.tt/3gm2GTW
via IFTTT

Thursday, August 20, 2020

(ECIL Recruitment) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती

ECIL, a Public Sector Enterprise under Department of Atomic Energy is looking for
dynamic and result-oriented personnel for the following temporary positions purely
on contract basis to work on sealing, distribution, polling, commissioning and FLC
activities of EVM and VVPAT at various project sites spread across India.

ECIL ही सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना असून खाली दिलेल्यता पदांकरिता पूर्णतः कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती जाहीर करीत आहे. सदर पदे हे देशभर पसरलेल्या विविध प्रकल्पांवर काम करण्यासाठी भरली जाणार आहेत.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयाची अट
टेक्निकल ऑफिसर
Technical Officer on
Contract
इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग /
मेकॅनिकल इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स / आयटी इंजिनिअरिंग
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाकडून एकूण 50% गुण
किमान 3 महिने कामाचा अनुभव
31 जुलै 2020 रोजी
18 ते 30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
फी फी नाही
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2020
दुपारी 02:00 वाजेपर्यंत



from WordPress https://ift.tt/326XspS
via IFTTT

Wednesday, August 19, 2020

‘डीआरडीओ’ची मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना

DRDO has launched “DRDO Scholarship Scheme for Girls“ through Aeronautics Research and Development Board (AR&DB), DRDO HQ.

AR&DB has been mandated to nurture quality aeronautics human power in the country since inception in 1971. This scholarship scheme would attract such women power from various institutes through a transparent process with an objective to tap the talent of bright students across the country. RAC invites online scholarship applications from the Girls / Women students studying in first year of Under Graduate (BE/B.TECH: full time four year degree) and Post Graduate (M.TECH/ME: two year full time degree course) under “DRDO Scholarship Scheme for Girls in Aerospace Engg / Aeronautical Engg / Space Engg & Rocketry / Avionics / Aircraft Engg” for FY 20-21, Batch-02 through RAC website

डीआरडीओने एरोनॉटिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड (एआर अँड डीबी), डीआरडीओ मुख्यालय यांच्यामार्फत “डीआरडीओची मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना” सुरू केली आहे.

ही शिष्यवृत्ती योजना देशातील तेजस्वी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शोधण्याच्या उद्देशाने पारदर्शक प्रक्रियेद्वारे विविध संस्थांकडून अशा महिला शक्तीला आकर्षित करेल. आरएसी अंडर ग्रॅज्युएट (बीई / बीटेक: पूर्णवेळ चार वर्षाची पदवी) आणि पोस्ट ग्रॅज्युएट (एमटीईसीएच / एमई: दोन वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम) च्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या मुली / महिला विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवते. आरएसी वेबसाइटद्वारे आर्थिक वर्ष 20-21, बॅच -02 मधील एरोस्पेस इंजिनियरिंग / एरोनॉटिकल इंजिनियरिंग / स्पेस इंजिनियरिंग व रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग मधील मुलींसाठी डीआरडीओ शिष्यवृत्ती योजना राबवत आहे.

विषय श्रेणी शिष्यवृत्तीची रक्कम  पद संख्या शैक्षणिक पात्रता
एरोस्पेस/एयरोनॉटिकल/स्पेस  & रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग. पदव्युत्तर रु. 15,500/- प्रति महिना(1,86,000/- प्रति वर्ष) दोन वर्षासाठी. 10 उमेदवाराला संबंधित ME/M.TECH / M.Sc Engg मध्ये सध्याच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात (2020-21) प्रवेश मिळायला हवा.  (ii) GATE
एरोस्पेस/एयरोनॉटिकल/स्पेस  & रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग. पदवीधर (अंडरग्रेजुएट) रु.1,20,000/-प्रति वर्ष किंवा वार्षिक शुल्क यापैकी जेकमीअसेलती रक्कम चार वर्षासाठी. 20 उमेदवाराला संबंधित B.E./ B. Tech./B.Sc Engg. मध्ये सध्याच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात (2020-21) प्रवेश मिळायला हवा  (ii) JEE (Main).
फी:  फी नाही 
ऑनलाईन अर्ज काण्याची शेवटची दिनांक  १५ नोव्हेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
जाहीरात  इथे क्लिक करा

Read also:



from WordPress https://ift.tt/2E6UB8u
via IFTTT

Tuesday, August 18, 2020

SSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे?

How to download SSC/HSC Result or Marksheet?

तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हरवले आहे?

किंवा

तुमच्या कंपनीत/कार्यालयात नव्याने रुजू होणाऱ्या व्यक्तीची दहावी-बारावीची प्रमाणपत्रके तुम्हाला बोर्डाकडून तपासून घ्यायची आहेत?

तर तुमच्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

ज्यांची प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रके हरवली आहेत किंवा त्यांना त्यांच्या पीडीएफ स्वरूपात प्रति हव्या आहेत, अश्यांसाठी हि सुविधा खूप कामाची ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण आज या लेखात घेणार आहोत.

आवश्यक माहिती

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक चालू इ-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, परीक्षेचा आसन क्रमांक आणि परीक्षेत मिळालेले एकूण गुण एवढे तपशील असणे गरजेचे आहे.

प्रक्रिया

A. खाते तयार कसे करावे?

  1. प्रथमतः महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाच्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. या वेबसाईटवर आल्यावर डाव्या बाजूला Create New Account या बटनावर क्लिक करून आपले नवे खाते तयार करण्यासाठीच्या अर्जावर जा.
  3. आता उघडलेल्या अर्जात नाव, श्रेणी(Category) मध्ये तुम्हाला स्वतःचे प्रमाणपत्र हवे असल्यास Individual निवडा, शाळेसाठी हवे असल्यास Institute आणि इतरांचे प्रमाणपत्र व्हेरिफाय करायचे असल्यास Other हा पर्याय निवडा.
  4. पुढच्या पर्यायात तुम्हाला फक्त दहावी/बारावीचे प्रमाणपत्र हवे की दोन्ही यानुसार SSC/HSC/SSC&HSC Both यापैकी एक पर्याय निवडा.
  5. पुढे तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी द्या.
  6. तुम्हाला हवा असलेला पासवर्ड टाईप करा(पासवर्डमध्ये किमान एक कॅपिटल अक्षर, किमान एक लहान इंग्रजी अक्षर, किमान एक अंक आणि किमान एक स्पेशल कॅरेक्टर उदा. @#$%*& असावेत)
  7. सर्वात शेवटी दिलेला कॅप्चा कोड भरून त्याखाली असलेलीच चेकबॉक्स ला क्लिक करा आणि रजिस्टर बटनावर क्लिक करा
  8. यानंतर तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाका आणि पूढे जा.

झालं तुमचं खातं तयार.

B. आपले प्रमाणपत्र कसे मिळवावे?

  1. आता तुम्ही दिलेला इ-मेल आयडी पासवर्ड वापरून पुन्हा लॉगिन करा.
  2. वेब पेजच्या वर VERIFY SSC/10th MARK SHEET आणि VERIFY HSC/12th MARK SHEET हे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.
  3. आता अनुक्रमे परीक्षेचे वर्ष, महिना, सीट क्रमांक आणि एकूण गुण टाकून कॅप्चा टाका आणि आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला तुमचे गुणांचे पूण तपशील स्क्रीनवर दिसतील आणि त्याखाली गुणपत्रिका(Marksheet) आणि प्रमाणपत्र(Board Certificate) डाउनलोड करण्यासही बटणे दिसतील. आता तुम्हाला हवे त्या पर्यायाला क्लिक करून तुम्ही आपले प्रमाणपत्र/गुणपत्रक डाउनलोड करू शकता.

C. आपल्या प्रमाणपत्रातील इ-स्वाक्षरी प्रमाणित कशी करावी?

(How to validate Digital Signature)

  1. आपल्या प्रमाणपत्रात खाली उजव्या बाजूला असलेली डिजिटल स्वाक्षरी पिवळ्या प्रश्नचिन्हात दर्शवलेली असेल तीला राईट क्लिक करा.

  2. आता Signature Validation Status विंडो मध्ये Signature Properties या बटनावर क्लिक करा.

  3. पुढे Certificate Viewer विंडो मध्ये Trust या टॅब मध्ये आल्यावर Add to Trusted Certificates या बटनावर क्लिक करा.

  4. समोर आलेल्या सूचनेतील OK या बटनावर क्लिक करा.

आता तुमच्या प्रमाणपत्रावरील इ-स्वाक्षरी हिरव्या रंगाच्या खुणेने दर्शवली गेलीअसेल म्हणजेच प्रमाणित झाली आहे.



from WordPress https://ift.tt/2YbTSK4
via IFTTT

चाकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!

मी स्वयंपाक कधी करायला लागलो हे खरेच आठवत नाही, पण स्वयंपाक करायला लागलो याचे कारण मात्र माझे बाबा होते. बाबा मुळातच खवय्ये होते आणि आई सुगरण, त्यामुळे आमच्या घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची. बाबांच्या या खवय्येगिरीमुळेच असेल कदाचित, मला स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली. अर्थातच शिकवायला आई होती, त्यामुळे शाळा-कॉलेजात असताना ती स्वयंपाक करताना कधीतरी स्वयंपाकघरात जाऊन ती काय करते हे बघणे एवढ्यापुरतेच माझे स्वयंपाक करणे मर्यादित होते.  

नंतर कामानिमित्त अमेरिकेत गेलो आणि बॅचलर म्हणून मित्रांसोबत राहिलो. तिथे लक्षात आले की कोणालाच स्वयंपाक येत नाही! मग त्यातल्या त्यात वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणून मी स्वयंपाक करायला लागलो. याचा दुसरा फायदा असा झाला की आपण स्वयंपाक करून मोकळे झालो की भांडी वगैरे घासायची जबाबदारी आपसूक आपल्यावर पडायची नाही! हळूहळू स्वयंपाकाची आवड वाढत गेली आणि मग पुढे लग्न झाल्यानंतर फॅमिली गेट-टुगेदर, पार्टी, मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर यासाठी मी आवर्जून इंटरनेटवर रेसिपी शोधून शोधून आवडीने बनवून त्यांना खायला घालायला लागलो. टीव्हीवर फूड चॅनल्स बघून नवीन पाककृती शिकायला लागलो.

यथावकाश सोशल मीडिया सुरू झाल्यावर मी बनवलेल्या पदार्थांच्या रेसिपी त्यावर टाकायला लागलो. मग एक दिवस हिम्मत करून स्वतःचा डोमेन विकत घेतला आणि माझ्या पककृतींना एक कायमचे घर मिळाले, ह्यातूनच http://www.EatLiveCook.comचा जन्म झाला.

हे सुरू असताना मनात कुठेतरी एक रुखरुख होती. मूळचा मेकॅनिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतलेला मी, २० वर्षे आयटी क्षेत्रात काम करत होतो. पण माझे मन मात्र फूड किंवा कुलिनरी जगात अधिक रमत आहे, हे कळायला लागले होते. पण मग ह्याचे नक्की काय करावे हे कळत नव्हते. “तू रेस्टॉरंट काढ” असे बऱ्याच लोकांनी अनेक वेळा मला सुचवले, पण मुळात आवड असली तरी त्या बाबतीत मला काहीच ज्ञान नव्हते. आणि माझी एक धारणा होती की आपण कुठल्याही क्षेत्रात उतरायचे तर त्याचा अभ्यास करूनच. कमर्शियल किचनमध्ये काम करायचे म्हणजे मग त्यामागे आपल्याला प्रशिक्षण हवे.

अशी घालमेल सुरू असताना, २०१६ मध्ये मला अचानक कुलिनरी अकॅडमी ऑफ इंडियाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कुलिनरी आर्ट्सच्या एक वर्षाच्या कोर्सबद्दल माहिती मिळाली.

या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मला हैदराबादला जाऊन त्यांची एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागणार होती. मी ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याआधी माझ्याबद्दल थोडी माहिती, त्यात माझे फूडबद्दलचे पॅशन याबद्दल त्यांना ई-मेलवर लिहिले. मला त्यांच्याकडून अर्ज करण्याची परवानगी आली आणि रीतसर फॉर्म भरून मी परीक्षेसाठी हैदराबादच्या त्यांच्या कॅम्पसवर गेलो.

हा अनुभव अतिशय सुंदर होता आणि बरेच काही शिकवून गेला. तिथे खरे तर सगळी तरुण मंडळी परीक्षेसाठी आली होती आणि मीच एकटा चाळिशीच्या वर होतो! या परीक्षेचे स्वरूप म्हणजे एक लेखी परीक्षा, एक मुलाखत आणि मग तीन तासाचे कुकिंग सेशन असे होते! या तीन तासांमध्ये आम्हाला एक थ्री कोर्स मील तयार करायचे होते. अर्ज करताना तुम्ही काय पाककृती तयार करणार आहात, आणि त्याला लागणारे जिन्नस ह्याची यादी आधीच पाठवून दिली होती. मला टेन्शन होते ते फक्त तीन तासांत आपल्या ठरवलेल्या गोष्टी व्यवस्थित होतात का नाही याची. पण खरे तर ते तीन तास मला अतिशय आनंद देऊन गेले. मी अगदी सराईतपणे त्यांच्या टेस्ट किचनमध्ये स्वयंपाक करू शकलो!
परीक्षक म्हणून एका नामांकित हॉटेलमधले हेड शेफ आले होते, त्यांनीदेखील माझ्या स्वयंपाकाचे बरेच कौतुक केले, त्यामुळे भरपूर आत्मविश्वास वाढला.

माझी मुलाखत आणि लेखी पेपरही चांगला गेला. पण मुलाखतीत त्यांच्या डायरेक्टर सरांनी मात्र मला पूर्वकल्पना दिली की तुझे वय आमच्या कोर्सच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नाही. पण तरीही त्यांनी आश्वासन दिले की ते प्रयत्न करतील आणि उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संपर्क साधून काही अपवाद घेता येईल का ते बघतील. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही आणि मी ऍडमिशनला मुकलो. पण हा अनुभव मात्र खूप काही देऊन गेला.

एक तर माझा आत्मविश्वास वाढला की मी काहीतरी वेगळे करू शकतो आणि मी आणखी जोमाने माझ्या नवनवीन पाककृती तयार करून त्या माझ्या ब्लॉगवर आणि नंतर misalpav.com या संकेतस्थळावर मराठीतून लिहायला लागलो. मिसळपाव.कॉमवरील माझ्या पाककृती http://misalpav.com/user/27618/authored इथे वाचायला मिळतील.

दरम्यानच्या काळात, मुलांच्या हट्टाखातर आम्ही घरात एक पाळीव प्राणी म्हणून कुत्रा घेतला. खरे तर कुत्रा पाळायला माझा विरोध होता, कारण फ्लॅट सिस्टिममध्ये कुत्र्याची देखभाल नीट होईल की नाही याची मला भीती होती. पण मला खरेच कल्पना नव्हती की ह्या कुत्र्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी आणि दिशा मिळणार आहे!

ब्रीडरच्या आणि बोल्टच्या (आमचा कुत्रा) व्हेटच्या (पशुवैद्याच्या) सल्ल्यानुसार आम्ही त्याला बाजारू जेवण (कमर्शियल डॉग फूड) द्यायला लागलो. त्याच्या जेवणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ड्रॉप्स टाकून दिवसातून ४ वेळेला एक छोटी वाटी डॉग फूड त्याचे फीडिंग होऊ लागले.

हे सुरू असताना लॅब्रॅडोर आणि एकंदर कुत्रा ह्याबद्दल आंतरजालावर भरपूर वाचून काढले. आतापर्यंत बघितलेले सगळे लॅब अतिशय थुलथुलीत, स्थूल असे बघितल्यामुळे ह्याबद्दल आपल्याला काय करता येईल हा विचार मनात आला आणि इथून खऱ्या अर्थाने माझी ‘श्वान प्रवासाची’ सुरुवात झाली.

कुत्र्यांना काय खायला द्यायला हवे, काय नको, त्यांच्या पचनसंस्थेवर कुठल्या प्रकारचे खाद्य विपरीत परिणाम करते, काय अनुकूल आहे याबद्दल आणि सध्या बाजारात मिळणाऱ्या डॉग फूडबद्दल आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दलदेखील भरपूर वाचन केले. (ह्याबद्दल पुढे जाऊन मी लेखन केले, http://www.shvaan.com/demystifying-dog-food/).

आमच्या कुत्र्यासाठी मग मी घरात काही वेगवेगळे प्रयोग करू लागलो. त्याच्या जेवणात काय घालता येईल, काय नको, काय आवश्यक आहे यावरून पाककृतीमध्ये योग्य तो बदल करून त्याला खायला घालत राहिलो. तब्बल दोन वर्षे हे असे वेगवेगळे प्रयोग करून सरतेशेवटी जन्माला आले ते म्हणजे ‘श्वान’चे पहिले प्रॉडक्ट!

आपल्या पाळीव कुत्र्याला एक संतुलित (बॅलन्स्ड) आहार कसा देता येईल याकडे कल जास्त होता.

माझ्या कुत्र्यामध्ये झालेले बदल पाहून आधी मित्रपरिवार, मग सोसायटीमधले इतर श्वानप्रेमी यांनी मला विचारणा सुरू केली आणि मग याबद्दल आपल्याला काय करता येईल यावर विचारमंथन सुरू झाले. आधी जवळच्या लोकांना, मित्रपरिवाराला किंवा ओळखीतून आलेल्या लोकांना मी हे प्रॉडक्ट) द्यायला लागलो. हळूहळू त्याचा विस्तार वाढत गेला. तिकडे आयटीमध्ये नोकरी सुरू होती, त्यामुळे हा सगळा उद्योग वीकएंडला करावा लागायचा. यात मला खंबीरपणे साथ दिली ती म्हणजे माझ्या आईने आणि माझ्या बायकोने! आठवडाभर ऑफिसमध्ये बारा-बारा तास काम करून वीकएंड खरे तर आरामाचा समजला जातो, पण आमच्या घरी मात्र वीकएंडला ह्याच्या बॅचेस तयार करणे सुरू असायचे. मला आठवतेय, कधीकधी तर शुक्रवारी रात्री घरी येऊन मग शनिवार पहाटे पहाटेपर्यंत आम्ही काम करत असायचो, कारण दुसर्‍या दिवशी कस्टमरला डिलिव्हरी द्यायची असायची! ह्या सगळ्यात खरे तर भरपूर दमून जायचो, पण तरीही त्याच उत्साहात आणि चिकाटीने पुढच्या वीकएंडला आम्ही पुन्हा तयार असायचो!

आधी स्वतःच्या कुत्र्याला द्यायला पाहिजे म्हणून छोट्या बॅचेस करायचो (१० किलो), आता मात्र ते वाढवावे लागले. हे खाद्य ऑल नॅचरल Wet Dog Food असल्यामुळे, टिकावे म्हणून मग जेव्हा घरातला फ्रीज कमी पडू लागला, तेव्हा एक डीप फ्रीझर विकत घेतला. पूर्वी हाताने करायची कामे आता थोडी पटकन व्हावी म्हणूंन मग एक पल्व्हरायझर मशीन घेतले. हळूहळू श्वानसाठी लागणारी मोठी भांडी, शेगड्या विकत घेतल्या.

अडचणी अनेक आल्या. एकदा वीज गेल्यामुळे एक बॅच खोळंबली आणि शेवटी सगळी बॅच खराब होईल ह्या भीतीने फेकून द्यावी लागली! पल्व्हरायझर मशीनमधून पहिल्यांदा प्रॉडक्ट काढले, तेव्हा ते खूप चिकट आहे असा कस्टमर फीडबॅक मिळाला, त्यावर तोडगा शोधून प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट आणली. आधी साध्या पॉलिथीन बॅगमध्ये भरून चक्क मेणबत्तीवर सील करून बॅग द्यायचो, आता व्हॅक्यूम सील्ड फूड ग्रेड बॅग्जपर्यंत प्रगती झाली.

एका कस्टमरपासून सुरू झालेला हा प्रवास आता २५ कस्टमर्सपर्यंत पोहोचला! इतर लोकांना हे प्रॉडक्ट द्यायला लागल्यापासून एक वर्ष होत आले आणि जवळजवळ एक मेट्रिक टन प्रॉडक्ट मी यशस्वीरित्या लोकांना दिलेले होते, त्यामुळे आता यात नक्कीच काहीतरी करण्यासारखे आहे, हा विचार आता पक्का झाला होता. १ जानेवारी २०१८ रोजी मी एका प्रोप्रायटरी फर्मचे रजिस्ट्रेशन करून टाकले आणि त्यातून जन्म झाला तो ‘बोल्ट फूड्स’चा!(Bolt Foods) श्वान या ब्रँडखाली आम्ही आमचे प्रॉडक्ट लॉन्च केले. श्वानचे संकेतस्थळ (वेबसाइट) तयार करून घेतले आणि सोशल मीडियासाठी श्वानचे फेसबुक पान, इन्स्टाग्राम आणि ट्विटर हँडल करून सोशल मीडियावरून त्याची जाहिरात सुरू केली.

श्वानचा पसारा हळूहळू वाढायला लागला होता. वर्ड-टू-माउथ पब्लिसिटीमुळे आणि सोशल मीडियामुळे कस्टमर्स वाढत गेले. फक्त वीकएंड्सना सगळी कामे करणे आता अवघड वाटायला लागले. प्रॉडक्ट लाइनमध्ये आणखी २ प्रॉडक्ट्स वाढवली आणि तीदेखील श्वानांच्या पसंतीस उतरली.

मग एक दिवस शांतपणे मी आणि बायकोने चर्चा करून ह्यात मी पूर्ण वेळ द्यायचा, असे ठरवले. सप्टेंबर २०१९मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःला ‘श्वान’मध्ये झोकून दिले.

पण मार्च २०२० आलाच तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कोरोना आणि लॉकडाउन हे दोन नवीन शब्द घेऊन! ह्या काळात ‘श्वान’ची निर्मिती करणे अवघड होत गेले. लॉकडाउनमुळे श्वान घरोघरी पोहोचवणे दुरापास्त होऊ लागले. इथे मात्र मला साथ मिळाली ते अतिशय संयमी आणि निष्ठावंत कस्टमर्सची! सगळ्याच कस्टमर्सनी आमच्या सोसायटीच्या दारात येऊन श्वान घेऊन जाण्याला मान्यता दिली! ह्याने आम्हाला एक प्रचंड दिलासा मिळाला आणि आपल्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेबद्दलचा आत्मविश्वास आणखीनच वाढला! कोरोनाच्या कठीण काळातदेखील ‘श्वान’ तरून आहे, तग धरून आहे ती मात्र नक्कीच आमच्या प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तेला एक छोटीशी सलामी आहे असे मी समजतो.

एक नोकरदार आयटी प्रोफेशनल ते एक छोटा उद्योजक असा प्रवास सुरू आहे. भरपूर शिकायला मिळतेय, अनुभवायला मिळतेय जे बहुधा नोकरी करताना शक्य झाले नसते.

आज श्वानसाठी २ कामगार पूर्णवेळ काम करत आहेत. एकट्या बोल्टपासून सुरु झालेल्या या प्रवासात आता विविध जातींचे शेकडो श्वान जोडले गेलेत. श्वानच्या नवीन लोगोच्या आणि नवीन पॅकेजेसच्या डिझाइनवर काम सुरू आहे. मनात बऱ्याच शंका आहेत, अनेक अडचणी आहेत, पण त्याची उत्तरे शोधताना, त्यावर मात करताना मज्जा येते आहे.

नोकरी करताना बऱ्याच वेळेला कामाच्या संबंधित निर्णय तुमच्या हातात नसतात, कधीकधी ते तुमच्यावर लादलेही जाऊ शकतात. इथे मात्र निर्णय आणि त्याचे होणारे परिणाम याला मलाच सामोरे जायचेय, त्यामुळे एक थोडीशी का होईना मोकळीक मिळते आहे. अर्थात इथे मोठ्या चुका महागात पडू शकतात, त्यामुळे प्रवास आणि निर्णय विचारपूर्वक सुरू आहे.

ह्यात मला खरी मोलाची साथ मिळाली आहे ती म्हणजे माझ्या घरच्यांची आणि मित्रमंडळींची, ज्यांचा मी सदैव ऋणी आहे.

केदार दीक्षित
http://www.Shvaan.com
Facebook|Instagram|Twitter|
@ShvaanDogFood



from WordPress https://ift.tt/3h71JQA
via IFTTT