Showing posts with label WordPress. Show all posts
Showing posts with label WordPress. Show all posts

Friday, November 13, 2020

WhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.

व्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर आणले आहे.

या फीचरच्या मदतीने युजर्सना आता एखाद्या व्हाट्सअप बिझनेस वर नोंदणी असलेल्या आणि वॉट्सअप बिझनेस ऍप्प  वापरणाऱ्या व्यावसायिकांकडून थेट खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. व्हाट्सअपने याआधीच आपली व्हाट्सअप पेमेंट्स ही सुविधा चालू करून युजर्सना पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे हि कामे सोपी करून ग्राहक आणि व्यावसायिकांना खरेदी-विक्री प्रक्रिया सुलभ केल्या आहेत.

या नव्या फीचर नुसार आता युजर्सना एखाद्या व्यवसायाच्या नावासमोर शॉपिंगचा आयकॉन दिसेल ज्यावर टॅप केले असता आपल्याला त्या त्या व्यावसायिकाकडे असलेली उत्पादने तसेच विविध सेवांची माहिती दिसेल.

या सुविधेमुळे व्यावसायिकांनाही मोठा फायदा होणार असून व्यावसायिकांना आता ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोचणे शक्य होणार आहे. तसेच छोटे, घरून काम करणारे व्यावसायिक तसेच घरूनच फोनवर किंवा ऑनलाईन ऑर्डर्स घेऊन विक्री करणारे व्यावसायिक यांना घरबसल्या जास्तीत जात ग्राहकांकडे पोचणे सहज शक्य होणार आहे.

ग्राहकांना यासाठी काहीही विशेष करायचे नसले तरी व्यावसायिकांना मात्र या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी काही गोष्टी नक्की कराव्या लागणार आहेत. यासाठी आपण पुढील बाबींची माहिती घेणे आवश्यक आहे.

Read Also:

आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

आता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.

  1. प्रथमतः व्यावसायिकांनी व्हाट्सअप बिझनेस(Whatsapp Business) हे अप्प आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. आपल्या फोनमध्ये आधीच व्हाट्सअप असले तरीही हे ऍप इंस्टाल होऊ शकते. आपण यासाठी आपल्या आधीच्या व्हाट्सअप क्रमांकापेक्षा वेगळा मोबाईल क्रमांक वापरणे गरजेचे आहे.
  2. मोबाईल क्रमांक आणि ओटीपी टाकल्यानंतर आपण आपल्या व्यवसायाचे नाव, त्याचा प्रकार यांची माहिती भरायची आहे.
  3. पुढली पायरी म्हणजे आपले प्रॉडक्ट कॅटलॉग(Catalogue) तयार करणे. आपण आपल्या व्यवसायामार्फत देत असलेल्या सेवा किंवा विकत असलेल्या उत्पादनाचे फोटो कॅटलॉग मध्ये अपलोड करू शकता. तसेच या सेवा किंवा उत्पादनांच्या किमतीही देऊ शकता.
  4. आता आपण पाहूया कि आपली उत्पादने किंवा सेवा व्हाट्सअप बिझनेसवर कश्या दाखवाव्यात. 
  5. नेहमीच्या व्हाट्सअप प्रमाणे आपल्याला चॅट विंडो दिसेल. त्यात उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन पर्यायांच्या बटनावर टॅप करा. 
  6. आता समोर आलेल्या पर्यायांपैकी पहिलाच पर्याय बिझनेस टूल्स(Business tools) निवडा. 
  7. आता दुसरा पर्याय कॅटलॉग निवडा आणि हिरव्या रंगात दिसणाऱ्या + या बटनावर टॅप करा. 
  8. समोर आलेल्या विंडोमध्ये आपल्या उत्पादनाचे/ सेवेचे नाव, किंमत भरा. अधिक माहिती भरायची असल्यास मोअर फिल्ड्स(More Fields) या पर्यायावर टॅप करून आपण उत्पादनाचे/ सेवेचे अधिक तपशील देऊ शकता.
  9. आपल्या उत्पादनाचे/ सेवेचे फोटो असल्यास ते फोटो फोनच्या गॅलरी मधून निवडून अपलोड करू शकता.
  10. सेव्ह या पर्यायावर क्लिक करून आपण वरील प्रक्रिया पुन्हा करून आणखी उत्पादनाचे/ सेवेचे कॅटलॉग बनवू शकता आणि ग्राहकांना पाठवू शकता.
  11. आता कुठलाही युजर ज्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक सेव्ह असेल, तो तुमचे प्रॉडक्ट कॅटलॉग बघू शकेल आणि तुमच्याशी व्यवहार करू शकेल. तसेच, ग्राहक जेव्हा आपला कॉन्टॅक्ट उघडतील तेव्हा त्यांना आपल्या व्यवसायाच्या नावापुढे स्टोअर आयकॉन दिसेल आणि त्यावर टॅप केल्यावर त्यांना आपले उत्पादनाचे/ सेवेचे कॅटलॉग दिसतील. त्यांना थेट रिप्लाय करून ग्राहक आपल्याशी संपर्क साधू शकतील.
  12. त्याचबरोबर, आपण आपल्या व्हाट्सअपवर आता आर्थिक व्यवहारही करू शकाल. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण कृपया इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडीओ पाहू शकता. किंवा इथे क्लिक करू शकता.

The post WhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/38FwJpu
via IFTTT

Friday, November 6, 2020

आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

खूप अडथळ्यानंतर एकदाचे व्हाट्सएपच्या पेमेंट( WhatsApp Payments) सुविधेची सुरुवात आता भारतात होणार आहे. आजच व्हाट्सअप आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल घोषणा केली आहे.

व्हाट्सअपने यासाठी National Payments Corporation of India (NPCI) शी संलग्न होऊन Unified Payment Interface (UPI) आधारित वर आधारित पेमेंट सिस्टम चालू केली आहे. यामुळे आता केवळ व्हाट्सअप वापरून आपण भारतातील जवळजवळ  160 बॅंकांमधील खात्यात व्यवहार करणे शक्य होणारआहे.

या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचे बँक खाते तसेच डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. ही सुविधा राबवण्यासाठी भारतातील चार आघाडीच्या बँका(ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, the State Bank of India) तसेच Jio Payments Bank बरोबर काम सुरु केले आहे.

व्हाट्सएपच्या इतर सुविधांप्रमाणे हि सुविधाही अत्यन्त सुरक्षित असल्याचे वक्तव्य यात व्हाट्सअपने केले आहे. तसेच यामुळे भारताच्या ग्रामीण भागातही सामान्य माणसांना आर्थिक व्यवहार करणे आता सोपे जाईल असा विश्वास व्हॅट्सऍपला वाटतो.

तूर्तास सगळ्याच युजर्सना हे अपडेट आले नसले तरी लवकरच भारतभर सर्व व्हाट्सअप युजर्सना ही सुविधा वापरणे जमणार आहे.

या सुविधेद्वारे पैसे पाठवण्यासाठी आपल्याला खालील पद्धतीचा वापर करावा लागेल.

  • व्हॅट्सऍपवर पर्याय (More Options) साठी वापरल्या जाणाऱ्या तीन डॉट्सच्या आयकॉनवर टॅप करा.

  • आता Settings > Payments > Add new account असे पर्याय निवडत पुढे आलेल्या नियम व अटी मान्य करा.

  • पुढे आलेल्या यादीमधून आपली बँक निवडा.

  • पुढे Verify via SMS या पर्यायाला टॅप करा. कदाचित व्हाट्सअप तुम्हाला व्हाट्सअप कॉल व एसेमेस साठी परवानगी मागेल तिथे Allow हा पर्याय निवडा.

  • तुमच्या मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यांपैकी हवे ते खाते निवडा.

  • झालं तुमचं बँक खातं व्हाट्सअप पेमेंटशी संलग्न. आता तुम्ही व्हाट्सएपच्या माध्यमातून या खात्यातून पैसे पाठवू शकता किंवा पैसे स्वीकारू शकता.

आता पाहूया आपण व्हाट्सअपने पैसे कसे पाठवू शकतो.

  • सर्वप्रथम आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे चॅट उघडा

  • मेसेज बॉक्समध्ये असलेल्या अटॅच बटनावर टॅप करा.

  • यात ‘पेमेंट’ नावाचा नवीन पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

  • आता तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे तेवढी रक्कम भरा. आणि ओके बटनावर टॅप करा.

  • तुम्हाला तुमचा UPI पिन क्रमांक विचारला जाईल. हा क्रमांक प्रविष्ट करा.

  • तुमचा व्यवहार पूर्ण झाला कि लगेच तुम्हाला त्यासंबंधी मेसेज येईल.

अधीक माहितीसाठी आपण पुढील व्हिडीओ पाहू शकता.

याबाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा UPI पिन कोणालाही सांगायचा नाहीये हे लक्षात असुद्या. तसेच आपले डेबिट कार्डचे तपशीलही कोणाला कळणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन गोष्टींची काळजी घेतल्यास व्हॅट्सऍपद्वारे आपल्याला सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार करणे सोपे होईल.

Read Also:

The post आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3oZE3Sq
via IFTTT

आता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.

व्हाट्सएपच्या आपोआप डीलीट होणाऱ्या मेसेजचे‘(Disappearing Messeges) फिचर लवकरच चालू होत आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हे फिचर सर्व युजर्सपर्यंत पोचलेले असेल. 

हे मेसेज सात दिवसांपर्यंत आपल्या फोनमध्ये रहातील, त्यानंतर अपोआप डिलीट होतील. हे फिचर वयक्तिक चॅट तसेच ग्रुप चॅट साठीही उपलब्ध असेल.

चला तर जाणून घेऊयात या सुविधेबाबत अधिक माहिती:

  • एकदा का ‘Disappearing Messeges’ हे फिचर चालू केले कि त्यानंतर पाठवले जाणारे मेसेजेस हे सात दिवसानंतर डिलीट व्हायला सुरुवात होईल. हे फिचर आपल्याला प्रत्येक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसाठी स्वतंत्रपणे चालू/बंद करता येईल.
  • यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओचंही समावेश असेल. पण, स्क्रिनशॉट काढणे किंवा कॉपी करणे यापासून बचावासाठी तूर्तास तरी काही सुविधा नाहीये. 
  • तसेच, ऑटो डाउनलोड केलेल्या मीडिया फाईल्स डिलीट होणार नाहीत.
  • जेव्हा आपण एखाद्या मेसेजला रिप्लाय करतो, तेव्हा तो मेसेज आपल्याला कोट मध्ये दिसतो त्याप्रमाणेच ‘Disappearing Messeges’ सात दिवसांनंतरही कोटच्या स्वरूपात दिसू शकतात. 
  • जर एखाद्या युजरने आपल्या व्हाट्सअप चॅटचे बॅकप घेतले असेल तर ‘Disappearing Messeges’ तसेच राहून जेव्हा तो युजर आपले चॅट पुन्हा रिस्टोर करेल तेव्हा सात दिवस पूर्ण झाल्यावर निघून जातील.

‘Disappearing Messeges’ कसे पाठवावेत?

  1. आपल्या चॅट विंडोमध्ये जाऊन आपल्याला हव्या त्या चॅटवर टॅप करा.
  2. चॅट कॉन्टॅक्टच्या नावावर टॅप करा.
  3. नावाखालील पर्यायांपैकी ‘Disappearing Messeges’ या पर्यायावर टॅप करा.
  4. आता ऑन पर्यायावर टॅप करा.

यापुढे आपण या कॉन्टॅक्टला पाठवलेले मेसेज हे सात दिवसांनी आपोआप निघून गेलेले असतील. 

एखाद्या व्हाट्सअप ग्रुपच्या बाबतीतही याच प्रक्रियेने आपण ‘Disappearing Messeges’ चालू किंवा बंद करू शकता. अर्थात, ग्रुपवर ही सुविधा चालू करण्यासाठी आपण ग्रुप ऍडमिन असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडीओ पाहू शकता.

Read Also:

The post आता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/357DgHn
via IFTTT

Wednesday, November 4, 2020

मायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च.

मायक्रोमॅक्स या एकेकाळच्या लोकप्रिय भारतीय भारतीय ब्रॅण्डने पुन्हा एकदा चिनी कंपन्यांना पछाडण्याचा संकल्प करत भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्याचे ठरवले आहे. मागची जवळजवळ चार वर्षे भारतीय बाजारपेठेतील पिछाडीवर असलेली मायक्रोमॅक्स आता पुन्हा एकदा ‘in’ या नव्या नावासह जोरदार कमबॅक करत आहे.

खूप दिवसांपासून चर्चेत असलेल्या या ब्रॅण्डचे 2 नवे स्मार्टफोन्स आज लॉन्च झाले आहेत. 

सादर स्मार्टफोन्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे स्मार्टफोन्स स्टॉक अँड्रॉइड प्रणालीवर चालणार असल्याने कुठल्याही प्रकारची अनावश्यक एप्स ग्राहकांच्या माथी मारली जाणार नाहीत. ज्यांना स्टॉक अँड्रॉइड प्रणाली वापरण्यास चांगली वाटते त्यांना या ब्रँड मुळे ते आता कमी किमतीतही वापरणे सहज शक्य होणार आहे.

मायक्रोमॅक्सने आपले in 1b आणि in note 1 हे दोन मॉडेल लॉन्च केले असून आपल्या श्रेणीमध्ये अत्यंत स्पर्धात्मक किमतीत जास्तीत जास्त फीचर्सचा यात समावेश केला आहे.

in 1b

प्रोसेसर आणि रॅम:

या फोनमध्ये MTK G35 हा प्रोसेसर असून तो 2.3 गिगाहर्टझ वर काम करेल. त्याचबरोबर PowerVR GE8320 हा जीपीयू आपल्याला मिळणार असून हा फोन 2GB आणि 4GB अश्या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

डिस्प्ले:

या फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले असून याचे रिझोल्युशन 1080×2400 (FHD+) आहे. हा डिस्प्ले 20:9 या प्रमाणात असणार आहे. 

फ्रंट कॅमेरासाठी याला मिनी ड्रॉप स्टाईल नॉच देण्यात आली आहे. 

कॅमेरा:

या फोनला मुख्य कॅमेरा हा 13 मेगापिक्सल आहे जो PDAF सह काम करील. त्याचबरोबर  2 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा आहे. 

सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल सेन्सर असलेला कॅमेरा वाईड अँगलसह देण्यात आला आहे.

बॅटरी:

हा फोन 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध असून या किमतीच्या इतर फोन्स मध्ये नसणारे रिव्हर्स चार्जिंग तसेच सी-टाईप चार्जिंग पोर्ट यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे चार्जिंग तसेच कम्प्युटरला डेटा ट्रान्स्फर कार्यासाखी कामे जलद गतीने होणार आहेत. मुख्य म्हणजे तुम्हाला 10 Watt चे चार्जर या फोंसोबतच मिळणार आहे. एवढ्या कमी किमतीच्या फोन्स मध्ये हि वैशिष्ट्ये क्वचितच कुठला ब्रँड आतापयंत देऊ शकला आहे. 

स्टोरेज क्षमता:

हा फोन 2GB RAM+32GB तसेच 4GB RAM+64GB या दोन व्हॅरिएंट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, अधिकचे मेमरी कार्ड वापरण्यासाठी सिम ट्रे मध्ये मेमरी कार्ड साठी खास स्लॉट देण्यात आला आहे.

किंमत:

या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत रु. 6,999/- पासून सुरु होत आहे.

In note 1

प्रोसेसर आणि रॅम:

या फोनमध्ये MTK G85 हा ऑक्टाकोअर प्रोसेसर असून तो 2.0 गिगाहर्टझ वर काम करेल. त्याचबरोबर ARM G52 MC2 हा जीपीयू आपल्याला मिळणार असून हा फोन  4GB रॅमच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

डिस्प्ले:

या फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले असून याचे रिझोल्युशन 1080×2400 (FHD+) आहे. हा डिस्प्ले 21:9 या प्रमाणात असणार आहे. 

फ्रंट कॅमेरासाठी याला आकर्षक अशी पंच होल स्टाईल नॉच देण्यात आली आहे. 

कॅमेरा:

या फोनला मुख्य कॅमेरा हा 48 मेगापिक्सल आहे जो PDAF सह काम करील. त्याचबरोबर  5 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा आहे जो वाईड अँगल फोटो काढू शकेल. मॅक्रो फोटोग्राफीची आवड असणारांसाठी यात एक 2 मेगापिक्सलचा खास सेन्सर असून आणखी एक 2 मेगापिक्सलचा सेन्सर डेप्थ सेन्सर म्हणून काम करेल.. 

सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल सेन्सर असलेला कॅमेरा वाईड अँगलसह देण्यात आला आहे.

बॅटरी:

हा फोन 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध असून या किमतीच्या इतर फोन्स मध्ये नसणारे रिव्हर्स चार्जिंग तसेच सी-टाईप चार्जिंग पोर्ट यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे चार्जिंग तसेच कम्प्युटरला डेटा ट्रान्स्फर कार्यासाखी कामे जलद गतीने होणार आहेत. मुख्य म्हणजे तुम्हाला 18 Watt चे चार्जर या फोंसोबतच मिळणार आहे. एवढ्या कमी किमतीच्या फोन्स मध्ये हि वैशिष्ट्ये क्वचितच कुठला ब्रँड आतापयंत देऊ शकला आहे. 

स्टोरेज क्षमता:

हा फोन 2GB RAM+32GB तसेच 4GB RAM+64GB या दोन व्हॅरिएंट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, अधिकचे मेमरी कार्ड वापरण्यासाठी सिम ट्रे मध्ये मेमरी कार्ड साठी खास स्लॉट देण्यात आला आहे.

किंमत:

या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत रु. 10,999/- पासून सुरु होत आहे.

इतर महत्वाचे फीचर्स

या फोन्सना गूगल असिस्टंट साठी खास बटन देण्यात आले आहे. 

फिंगरप्रिंट सेन्सर मागच्या बाजूला देण्यात आला आहे.

या फोन्सना Bluetooth 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. 

फोन वापरताना काही समस्या अथवा बिघाड झाल्यास मायक्रोमॅक्स साठ मिनिटांत आवश्यक सेवा देण्याचे आश्वासन या फोनच्या बाबतीत देते. 

तसेच किमान दोन वर्षे अँड्रॉइड अपडेट्स पुरवण्याचे आश्वासनही मायक्रोमॅक्स या दोन्ही फोन्सच्या बाबतीत देत आहे. 

हे दोन्ही फोन्स एंट्री लेव्हल तसेच मिड रेंज सेगमेंट मधील इतर ब्रँड्सच्या फोन्सना नक्की टक्कर देऊ शकतील कारण एवढ्या कमी किमतीत फास्ट चार्जर, टाईप सी पोर्ट, रिव्हर्स चार्जिंग सुविधा तसेच तगडा  कॅमेरा आणि प्रोसेसर सारख्या वैशिष्टयपूर्ण बाबींसह हे फोन्स इतर प्रस्थापित ब्रॅण्ड्सच्या मानाने कमी किमतीत आपले फोन बाजारात उतरत आहेत. 

हे स्मार्टफोन्स flipkart.com या इ-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. आता हे स्मार्टफोन्स ग्राहकांच्या किती पसंतीस पडतात हे पाहणे रोचक ठरणार आहे. 

आशा करूया मायक्रोमॅक्सने किंमत आणि वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स बरोबरच आपल्या आफ्टर सेल्स सर्व्हिसमध्ये सुद्धा सुधारणा केल्या  असतील. जेणेकरून ग्राहकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढवणे सोपे जाईल. 

Read also:

(Google Virtual visiting cards) गुगलने आणले डिजिटल व्हिजिटिंग कार्ड!
ASUS ROG Phone 3, एक दमदार गेमिंग फोन

The post मायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2HVBCzO
via IFTTT

Tuesday, November 3, 2020

महाराष्ट्र डाक विभागामध्ये विविध 1371 रिक्तपदांसाठी भरती (मुदतवाढ)

Maharashtra Postal Recruitment 2020 : महाराष्ट्र डाक विभागामध्ये विविध 1371 रिक्तपदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत .

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 पोस्टमन
Postman
10th standard Pass 1029 18-27
2 मेल गार्ड
Mail Guard
12th standard Pass  15 18-27
3 मल्टीटास्किंग कर्मचारी
MTS
(Administrative Officer)- 
12th standard Pass 32 18-25
4 मल्टीटास्किंग कर्मचारी
MTS
(Sub Ordinate Office) – 
12th standard Pass 295 18-25
एकूण पदसंख्या 1371
फी  : UR/OBC/EWS/Trans-man.: 400/- , [SC/ ST/Woman/PWD : फी नाही
अर्ज चालू होण्याची दिनांक : 05.10.2020
अंतिम दिनांक : 1०.11.2020(मुदतवाढ)
बसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

The post महाराष्ट्र डाक विभागामध्ये विविध 1371 रिक्तपदांसाठी भरती (मुदतवाढ) first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3oSNK4V
via IFTTT

Friday, October 16, 2020

Flipkart Big Billion Days Sale Top Offers फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज ऑफर्स

Flipkart Big Billion Sale Top Offers :

वस्तूचे नाव  जुनी किंमत  ऑफर किंमत 
सॅमसंग गॅलेक्सी  F 41 19999 14499
रिअल मी नारझो 20 12999 10499
रिअल मी C 11  8999 6499
रिअल मी स्मार्ट टीव्ही  14999 11499
एम आय नोटबुक 12 52999 43999
ब्रँडेड स्पोर्ट्स शू 50 % सूट  60% – 80% सूट
रिअल मी 108cm  स्मार्ट अँड्रॉईट टीव्ही  25999 19999
रिअल मी C 15 11999 8499
ड्रझो 18 इंच लॅपटॉप बॅग 1299 339
नोकिया 139 cm Led स्मार्ट अँड्रोईड टीव्ही विथ जे. बी. एल. साऊंड  70999 39999
बोट 2000 160w साऊंडबार  24990 7299
अँपल iPhone SE  ब्लॅक  42500 27999
पोर्टोनिकस हार्मोनिक्स ट्विन्स 22 स्मार्ट एअरपोड ब्लूटूथ हेहेडसेट  2999 699
वंडरशेफ नुट्री ब्लेंड मिक्सर ज्युसर 400 w 5000 2199

The post Flipkart Big Billion Days Sale Top Offers फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज ऑफर्स first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/341oMIg
via IFTTT

Thursday, October 15, 2020

How to create Passport Size Photos in Photoshop in 30 seconds

Lots of new photographers struggle to complete simple tasks like making Passport Size Photos for their customers.

Actually it’s really easy to make Passport size photos but copy-pasting multiple layers makes it a time consuming task.

To tackle this issue, I am giving you a Photoshop Action File(.atn) and a complete workflow for the same.

So, Let’s get started.

How to create Passport Size Photos in Photoshop in 30 seconds
  • Now open the photo you want to create passport size image and do required corrections and touch-ups as needed.
  • In the actions toolbar, select the loaded action and then click the ‘Play’ button at the bottom of the actions toolbar.
Now open the photo you want to create passport size image and do required corrections and touch-ups as needed. In the actions toolbar, select the loaded action and then click the ‘Play’ button at the bottom of the actions toolbar. Now, you’ll be prompted to Transform your image to perfectly fit in the frame area. Once you set your image as required, hit the ‘Enter’ button. <a href=Photoshop will start working and in a second or two, your printable image will be ready.”/>
  • Now, you’ll be prompted to Transform your image to perfectly fit in the frame area. Once you set your image as required, hit the ‘Enter’ button.
Now, you’ll be prompted to Transform your image to perfectly fit in the frame area. Once you set your image as required, hit the ‘Enter’ button. <a href=Photoshop will start working and in a second or two, your printable image will be ready.”/>

Photoshop will start working and in a second or two, your printable image will be ready.

Photoshop will start working and in a second or two, your printable image will be ready.

Hope this Action and workflow will help you create Passport Size Photos instantly. If you have any other query, kindly comment below.

The post How to create Passport Size Photos in Photoshop in 30 seconds first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2H1Wqov
via IFTTT

Tuesday, October 13, 2020

IOCL Recruitment 2020 इंडियन ऑईल भरती(57 पदे)

Being The Energy of India is much more than just notching up high turnover (Rs 5,66,950 crore in 2019-20). It’s far more than being ranked 151st among the world’s largest corporates in Fortune’s ‘Global 500’ listing, and the vision to become ‘a globally admired company.’

Being The Energy of India is about IndianOil, with its over 33,500-strong team, taking the lead in meeting India’s energy demands efficiently and effectively today, just as it has done over the last six decades and an enterprise that fuels India’s core sector for economic development.

IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑईल लिमिटेड मध्ये एकूण 57 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज पोस्टाच्या साहाय्याने स्वीकारण्यात येणार आहेत .

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
01 वर्ष अनुभव
49 18 ते 26 वर्षे.
2 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (Mech Fitter-cum-Rigger)/ ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10 वी उत्तीर्ण व ITI (फिटर) 
01 वर्ष अनुभव 
03 18 ते 26 वर्षे.
3 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV  (इंस्ट्रूमेंटेशन )/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा
01 वर्ष अनुभव 
04  18 ते 26 वर्षे.
4 ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) 
01 वर्ष अनुभव 
01 18 ते 26 वर्षे.
एकूण पदसंख्या 57
फी  :  General/OBC/EWS :150/- SC/ST/PWD/ExSM: फी नाही 
Online अर्ज अंतिम दिनांक : 07 नोव्हेंबर 2020 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक : 28 नोव्हेंबर 2020
वेबसाईट :येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Post Box No.128, Panipat Head Post Office, Panipat, Haryana-132103
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

swadeshishops.com या वेबसाईटसाठी पूर्ण भारतभर भरती

The post IOCL Recruitment 2020 इंडियन ऑईल भरती(57 पदे) first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/314EBvX
via IFTTT

Monday, October 12, 2020

swadeshishops.com या वेबसाईटसाठी पूर्ण भारतभर भरती.

swadeshishops.com ही वेबसाईट आपल्या Swadeshi Foodie तसेच Swadeshi Shops या Apps च्या माध्यमातून भारतभर आपले जाळे पसरवत आहे. सदर कामासाठी त्यांना विविध पदांवर भारतभर कर्मचाऱ्यांची गरज असून यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती चालू आहे.

सदर भरतीतील काही पदे आकर्षक कमिशनवर तसेच काही पदे मासिक वेतनावर भरण्यात येतील(कृपया हे नेटवर्क मार्केटिंग/चेन मार्केटिंग सारखे काम नाही याची नोंद घ्यावी).

पदे :

सेल्स पर्सन तसेच सेल्स मॅनेजर

शैक्षणिक पात्रता:

किमान दहावी पास.

उत्तम संवाद कौशल्य हवे.

वयोमर्यादा:

१८ वर्षे पूर्ण असलेला कुठलाही स्त्री/पुरुष उमेदवार.

मासिक वेतन:

रु. १०,००० ते १,००,०००/- (आपले शिक्षण, कामाचा अनुभव, कौशल्य यावर अवलंबून)

स्वदेशीशॉप्स.कॉम मद्दल आणखी माहिती मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

सदर भरतीसाठी उमेदवारांनी आपले तपशील इथे क्लिक करून भरावेत.

The post swadeshishops.com या वेबसाईटसाठी पूर्ण भारतभर भरती. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3iR4p4W
via IFTTT

Thursday, October 8, 2020

NHM Palghar Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (121 पदे)

NHM Palghar Recruitment 2020 : पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकूण 121 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ईमेलद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या 
1 फिजिशियन
Physician
मेडिसिन
MD Medicine
24
2 भुलतज्ञ
Anesthetist
संबंधित पदवी/डिप्लोमा
AnesthetistDegree/Diploma in/Anesthesia
21
3 वैद्यकीय अधिकारी
Medical Officer 
MBBS
किंवा 
BAMS/BUMS/BDS
76
एकूण पदसंख्या 121
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2020 (06:15 PM) 
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
Email ID : cscovid19palghar@gmail.com 

BECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. भरती(500 पदे )

The post NHM Palghar Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (121 पदे) first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/34CNq0X
via IFTTT

Wednesday, October 7, 2020

BECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. भरती(500 पदे )

To be a world-class consultancy organization recognized as a “BRAND” in the specialized fields of Broadcast of Engineering & Information Technology and related infrastructure development for total project solutions in India and Abroad.

BECIL Recruitment 2020 : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये एकूण 500 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

1 कुशल मनुष्यबळ
Skilled Manpower

ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकी मध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
1000 18 ते 45 वर्षे 
2 अकुशल मनुष्यबळ
Unskilled Manpower
8वी उत्तीर्ण
इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.
500 18 ते 45 वर्षे 
एकूण पदसंख्या 1500
फी : General/OBC : 500/-  SC/ST/PH : 250-
अंतिम दिनांक : 20.10.2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

Maharashtra Postal Recruitment 2020 महाराष्ट्र डाक विभाग भरती(1371 पदे)

The post BECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. भरती(500 पदे ) first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2GDIu3D
via IFTTT