Sunday, August 2, 2020

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.

तुम्हाला फोटोग्राफी शिकायचीय? किंवा तुम्ही फोटोग्राफर आहात आणि तुम्हाला त्यात आणखी कलात्मकता आणायची आहे?

चला तर आज पाहुयात काही भारतीय फोटोग्राफी चॅनेल्स जे तुम्हाला फोटोग्राफी शिकण्यास आणि तुमची फोटोग्राफी अधिकाधिक कलात्मक करण्यासाठी कुठले Youtube Channels नक्की पाहावेत.

एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे यात फक्त मराठी चॅनल्स नसून हिंदी आणि इंग्रजींतीलही चॅनल्स आहेत.

हे चॅनल्स निवडताना फक्त त्यांची लोकप्रियता आणि व्ह्यूज लक्षात न घेता त्यांची विषयाची मांडणी व शिकवण्यातला सहजपणा हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला गेला आहे.

Camzia

हा चॅनल तुम्हाला सर्वप्रकारचे फोटोग्राफी ज्ञान मिळवण्यासाठी उत्तम आहे. मुख्य म्हणजे हा मराठीतून आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे यात फोटोग्राफीचे अनेक पैलू तर समाविष्ट आहेतच पण त्याचबरोबर यात अनेक व्यावसायिक आणि प्रथितयश फोटोग्राफर्स आपल्याला मार्गदर्शन करतात.

या युट्युब चॅनलच्या मदतीने आपल्याला फोटोग्राफी ट्रिक्स सोबतच वेडिंग, प्रिवेडिंग, फोटो अल्बम बनवणे, मॉडेलिंग तसेच फोटोशॉप आणि लाईटरूम सारख्या विविध सॉफ्टवेअर्स बद्दल भरपूर व्हिडीओज बघायला मिळतील.

चॅनलची भाषा : मराठी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Camzia

Maneesh Saxena

मनीष सक्सेना यांचे व्हिडीओ देखील Camzia प्रमाणेच फोटोग्राफीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे आहेत. यातही अनेक फोटोशूटचे Behind The Scene (BTS) व्हिडीओ दिले असल्याने एखाद्या फोटोग्राफी प्रकाराच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेणे सहज शक्य होते.

वेडिंग, प्रिवेडिंग आणि मॉडेलिंग सारख्या विषयांवर उत्तम व्हिडीओज या चॅनलवर आहेत.

चॅनलची भाषा : हिंदी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Maneesh Saxena

Kunal Malhotra – The Photography Blogger

कुणाल मल्होत्रा हा हिंदी फोटोग्राफी ब्लॉगर आणि अत्यंत सोप्या भाषेत विविध प्रकारचे फोटो कसे काढावेत तसेच फोटोग्राफीत विविध संकल्पना साधेपणाने मांडतो.

यूट्यूबप्रमाणेच इंस्टाग्रामवर सुद्धा हा नेहमी पोस्ट करत असतो. विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून कुणाल नव्या फोटोग्राफर्सना प्रोत्साहन देत असतो.

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Kunal Malhotra – The Photography Blogger

GMAX STUDIOS HINDI

या चॅनलवर तुम्हाला अनेक प्रकारचे कॅमेरा-लेन्स रिव्ह्यू आणि विविध प्रकारच्या फोटोग्राफी प्रकारांबद्दल जाणून घेता येईल.

सिनेमॅटिक व्हिडीओज, फिल्म मेकिंग सारख्या विषयांवरही या चॅनलवर भरपूर व्हिडीओज आहेत त्यामुळे व्हिडीओग्राफीसाठी सुद्धा हा चॅनल तुम्ही नक्की फॉलो करू शकता.

चॅनलची भाषा : हिंदी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
GMAX STUDIOS HINDI

Saurav Sinha

सौरव सिन्हा हा एक तरुण फोटोग्राफर असून त्याचे इंग्रजीत व्हिडीओ इंग्रजीत असले तरीही समजण्यास अत्यंत सोपे असतात. फोटोग्राफीत नेहमीच्या विषयाबरोबर अनेक वेगळ्या संकल्पनांवरही व्हिडीओज आहेत.

सोप्या उदाहरणांसोबत तो आपल्याला फोटोग्राफीत बारकावे उत्तम प्रकारे समजावून सांगतो.

चॅनलची भाषा : इंग्रजी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Saurav Sinha

ज्यांना फोटोग्राफी शिकायचीय अशा प्रत्येकाला हे चॅनल्स नक्कीच मदत करतील अशी आम्हाला आशा आहे आणि तुम्हाला आणखी कुठल्या चॅनलबद्दल माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की त्याबद्दल लिहा.

Read Also: Canon EOS 5D च्या फॅन्ससाठी वाईट बातमी

The post फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा. appeared first on stepupmarathi.

from WordPress https://ift.tt/3hSG6mS
via IFTTT

No comments:

Post a Comment