Friday, November 6, 2020

आता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.

व्हाट्सएपच्या आपोआप डीलीट होणाऱ्या मेसेजचे‘(Disappearing Messeges) फिचर लवकरच चालू होत आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हे फिचर सर्व युजर्सपर्यंत पोचलेले असेल. 

हे मेसेज सात दिवसांपर्यंत आपल्या फोनमध्ये रहातील, त्यानंतर अपोआप डिलीट होतील. हे फिचर वयक्तिक चॅट तसेच ग्रुप चॅट साठीही उपलब्ध असेल.

चला तर जाणून घेऊयात या सुविधेबाबत अधिक माहिती:

  • एकदा का ‘Disappearing Messeges’ हे फिचर चालू केले कि त्यानंतर पाठवले जाणारे मेसेजेस हे सात दिवसानंतर डिलीट व्हायला सुरुवात होईल. हे फिचर आपल्याला प्रत्येक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसाठी स्वतंत्रपणे चालू/बंद करता येईल.
  • यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओचंही समावेश असेल. पण, स्क्रिनशॉट काढणे किंवा कॉपी करणे यापासून बचावासाठी तूर्तास तरी काही सुविधा नाहीये. 
  • तसेच, ऑटो डाउनलोड केलेल्या मीडिया फाईल्स डिलीट होणार नाहीत.
  • जेव्हा आपण एखाद्या मेसेजला रिप्लाय करतो, तेव्हा तो मेसेज आपल्याला कोट मध्ये दिसतो त्याप्रमाणेच ‘Disappearing Messeges’ सात दिवसांनंतरही कोटच्या स्वरूपात दिसू शकतात. 
  • जर एखाद्या युजरने आपल्या व्हाट्सअप चॅटचे बॅकप घेतले असेल तर ‘Disappearing Messeges’ तसेच राहून जेव्हा तो युजर आपले चॅट पुन्हा रिस्टोर करेल तेव्हा सात दिवस पूर्ण झाल्यावर निघून जातील.

‘Disappearing Messeges’ कसे पाठवावेत?

  1. आपल्या चॅट विंडोमध्ये जाऊन आपल्याला हव्या त्या चॅटवर टॅप करा.
  2. चॅट कॉन्टॅक्टच्या नावावर टॅप करा.
  3. नावाखालील पर्यायांपैकी ‘Disappearing Messeges’ या पर्यायावर टॅप करा.
  4. आता ऑन पर्यायावर टॅप करा.

यापुढे आपण या कॉन्टॅक्टला पाठवलेले मेसेज हे सात दिवसांनी आपोआप निघून गेलेले असतील. 

एखाद्या व्हाट्सअप ग्रुपच्या बाबतीतही याच प्रक्रियेने आपण ‘Disappearing Messeges’ चालू किंवा बंद करू शकता. अर्थात, ग्रुपवर ही सुविधा चालू करण्यासाठी आपण ग्रुप ऍडमिन असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडीओ पाहू शकता.

Read Also:

The post आता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/357DgHn
via IFTTT

No comments:

Post a Comment