Friday, November 6, 2020

आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

खूप अडथळ्यानंतर एकदाचे व्हाट्सएपच्या पेमेंट( WhatsApp Payments) सुविधेची सुरुवात आता भारतात होणार आहे. आजच व्हाट्सअप आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल घोषणा केली आहे.

व्हाट्सअपने यासाठी National Payments Corporation of India (NPCI) शी संलग्न होऊन Unified Payment Interface (UPI) आधारित वर आधारित पेमेंट सिस्टम चालू केली आहे. यामुळे आता केवळ व्हाट्सअप वापरून आपण भारतातील जवळजवळ  160 बॅंकांमधील खात्यात व्यवहार करणे शक्य होणारआहे.

या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचे बँक खाते तसेच डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. ही सुविधा राबवण्यासाठी भारतातील चार आघाडीच्या बँका(ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, the State Bank of India) तसेच Jio Payments Bank बरोबर काम सुरु केले आहे.

व्हाट्सएपच्या इतर सुविधांप्रमाणे हि सुविधाही अत्यन्त सुरक्षित असल्याचे वक्तव्य यात व्हाट्सअपने केले आहे. तसेच यामुळे भारताच्या ग्रामीण भागातही सामान्य माणसांना आर्थिक व्यवहार करणे आता सोपे जाईल असा विश्वास व्हॅट्सऍपला वाटतो.

तूर्तास सगळ्याच युजर्सना हे अपडेट आले नसले तरी लवकरच भारतभर सर्व व्हाट्सअप युजर्सना ही सुविधा वापरणे जमणार आहे.

या सुविधेद्वारे पैसे पाठवण्यासाठी आपल्याला खालील पद्धतीचा वापर करावा लागेल.

  • व्हॅट्सऍपवर पर्याय (More Options) साठी वापरल्या जाणाऱ्या तीन डॉट्सच्या आयकॉनवर टॅप करा.

  • आता Settings > Payments > Add new account असे पर्याय निवडत पुढे आलेल्या नियम व अटी मान्य करा.

  • पुढे आलेल्या यादीमधून आपली बँक निवडा.

  • पुढे Verify via SMS या पर्यायाला टॅप करा. कदाचित व्हाट्सअप तुम्हाला व्हाट्सअप कॉल व एसेमेस साठी परवानगी मागेल तिथे Allow हा पर्याय निवडा.

  • तुमच्या मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यांपैकी हवे ते खाते निवडा.

  • झालं तुमचं बँक खातं व्हाट्सअप पेमेंटशी संलग्न. आता तुम्ही व्हाट्सएपच्या माध्यमातून या खात्यातून पैसे पाठवू शकता किंवा पैसे स्वीकारू शकता.

आता पाहूया आपण व्हाट्सअपने पैसे कसे पाठवू शकतो.

  • सर्वप्रथम आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे चॅट उघडा

  • मेसेज बॉक्समध्ये असलेल्या अटॅच बटनावर टॅप करा.

  • यात ‘पेमेंट’ नावाचा नवीन पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

  • आता तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे तेवढी रक्कम भरा. आणि ओके बटनावर टॅप करा.

  • तुम्हाला तुमचा UPI पिन क्रमांक विचारला जाईल. हा क्रमांक प्रविष्ट करा.

  • तुमचा व्यवहार पूर्ण झाला कि लगेच तुम्हाला त्यासंबंधी मेसेज येईल.

अधीक माहितीसाठी आपण पुढील व्हिडीओ पाहू शकता.

याबाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा UPI पिन कोणालाही सांगायचा नाहीये हे लक्षात असुद्या. तसेच आपले डेबिट कार्डचे तपशीलही कोणाला कळणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन गोष्टींची काळजी घेतल्यास व्हॅट्सऍपद्वारे आपल्याला सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार करणे सोपे होईल.

Read Also:

The post आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3oZE3Sq
via IFTTT

No comments:

Post a Comment