Friday, November 13, 2020

WhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.

व्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर आणले आहे.

या फीचरच्या मदतीने युजर्सना आता एखाद्या व्हाट्सअप बिझनेस वर नोंदणी असलेल्या आणि वॉट्सअप बिझनेस ऍप्प  वापरणाऱ्या व्यावसायिकांकडून थेट खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. व्हाट्सअपने याआधीच आपली व्हाट्सअप पेमेंट्स ही सुविधा चालू करून युजर्सना पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे हि कामे सोपी करून ग्राहक आणि व्यावसायिकांना खरेदी-विक्री प्रक्रिया सुलभ केल्या आहेत.

या नव्या फीचर नुसार आता युजर्सना एखाद्या व्यवसायाच्या नावासमोर शॉपिंगचा आयकॉन दिसेल ज्यावर टॅप केले असता आपल्याला त्या त्या व्यावसायिकाकडे असलेली उत्पादने तसेच विविध सेवांची माहिती दिसेल.

या सुविधेमुळे व्यावसायिकांनाही मोठा फायदा होणार असून व्यावसायिकांना आता ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोचणे शक्य होणार आहे. तसेच छोटे, घरून काम करणारे व्यावसायिक तसेच घरूनच फोनवर किंवा ऑनलाईन ऑर्डर्स घेऊन विक्री करणारे व्यावसायिक यांना घरबसल्या जास्तीत जात ग्राहकांकडे पोचणे सहज शक्य होणार आहे.

ग्राहकांना यासाठी काहीही विशेष करायचे नसले तरी व्यावसायिकांना मात्र या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी काही गोष्टी नक्की कराव्या लागणार आहेत. यासाठी आपण पुढील बाबींची माहिती घेणे आवश्यक आहे.

Read Also:

आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

आता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.

  1. प्रथमतः व्यावसायिकांनी व्हाट्सअप बिझनेस(Whatsapp Business) हे अप्प आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. आपल्या फोनमध्ये आधीच व्हाट्सअप असले तरीही हे ऍप इंस्टाल होऊ शकते. आपण यासाठी आपल्या आधीच्या व्हाट्सअप क्रमांकापेक्षा वेगळा मोबाईल क्रमांक वापरणे गरजेचे आहे.
  2. मोबाईल क्रमांक आणि ओटीपी टाकल्यानंतर आपण आपल्या व्यवसायाचे नाव, त्याचा प्रकार यांची माहिती भरायची आहे.
  3. पुढली पायरी म्हणजे आपले प्रॉडक्ट कॅटलॉग(Catalogue) तयार करणे. आपण आपल्या व्यवसायामार्फत देत असलेल्या सेवा किंवा विकत असलेल्या उत्पादनाचे फोटो कॅटलॉग मध्ये अपलोड करू शकता. तसेच या सेवा किंवा उत्पादनांच्या किमतीही देऊ शकता.
  4. आता आपण पाहूया कि आपली उत्पादने किंवा सेवा व्हाट्सअप बिझनेसवर कश्या दाखवाव्यात. 
  5. नेहमीच्या व्हाट्सअप प्रमाणे आपल्याला चॅट विंडो दिसेल. त्यात उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन पर्यायांच्या बटनावर टॅप करा. 
  6. आता समोर आलेल्या पर्यायांपैकी पहिलाच पर्याय बिझनेस टूल्स(Business tools) निवडा. 
  7. आता दुसरा पर्याय कॅटलॉग निवडा आणि हिरव्या रंगात दिसणाऱ्या + या बटनावर टॅप करा. 
  8. समोर आलेल्या विंडोमध्ये आपल्या उत्पादनाचे/ सेवेचे नाव, किंमत भरा. अधिक माहिती भरायची असल्यास मोअर फिल्ड्स(More Fields) या पर्यायावर टॅप करून आपण उत्पादनाचे/ सेवेचे अधिक तपशील देऊ शकता.
  9. आपल्या उत्पादनाचे/ सेवेचे फोटो असल्यास ते फोटो फोनच्या गॅलरी मधून निवडून अपलोड करू शकता.
  10. सेव्ह या पर्यायावर क्लिक करून आपण वरील प्रक्रिया पुन्हा करून आणखी उत्पादनाचे/ सेवेचे कॅटलॉग बनवू शकता आणि ग्राहकांना पाठवू शकता.
  11. आता कुठलाही युजर ज्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक सेव्ह असेल, तो तुमचे प्रॉडक्ट कॅटलॉग बघू शकेल आणि तुमच्याशी व्यवहार करू शकेल. तसेच, ग्राहक जेव्हा आपला कॉन्टॅक्ट उघडतील तेव्हा त्यांना आपल्या व्यवसायाच्या नावापुढे स्टोअर आयकॉन दिसेल आणि त्यावर टॅप केल्यावर त्यांना आपले उत्पादनाचे/ सेवेचे कॅटलॉग दिसतील. त्यांना थेट रिप्लाय करून ग्राहक आपल्याशी संपर्क साधू शकतील.
  12. त्याचबरोबर, आपण आपल्या व्हाट्सअपवर आता आर्थिक व्यवहारही करू शकाल. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण कृपया इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडीओ पाहू शकता. किंवा इथे क्लिक करू शकता.

The post WhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/38FwJpu
via IFTTT

No comments:

Post a Comment