Wednesday, September 30, 2020

How to Activate UAN Number?

There are various methods to Activate UAN number on the EPFO Member Portal. In this Article, we are going to get answers for your all questions like:

How to Activate UAN Number?

How to Activate UAN Number when you have only PF number?

What to do if my Date of Birth or Name is not Matching with UAN Data?

How to Activate UAN Number?

So, let’s assume that your employer has given you the UAN Number for your PF account and you want to activate it to complete formalities like EPF KYC of EPF Claims.

First, go to EPF Member Portal by clicking here or simply search Member Home on google.

Once you reach the home page of EPFO, go to links provided in the Important Links section. The first link you’ll see is Activate UAN. simply hit that button to go to the UAN Activation Page.

Once you get to this window, enter your UAN Number in the first row.

Then Enter your name as your employer has mentioned while filing your PF. The same has to be done with our date of birth. Once you have entered those details, jump to the Mobile No. section and provide your active mobile number. Remember that the OTP for Activation of your UAN will be sent to this number.

Providing your Email Id is not mandatory but we’ll recommend you to provide it.

Then fill the Captcha code carefully and hit the Get Authorization Pin button.

You’ll receive an OTP on the same mobile number which you have provided. Enter that OTP and click the submit button.

You’ll receive the password through SMS.

Well, this sounds very easy at first and it is very simple until you have a UAN Number and Perfectly filled Name and Date of Birth. So, let’s see:

How to Activate UAN Number?

How to Activate UAN Number when you have only PF number?

Well, the process to Activate the UAN Number when you have only a PF number is almost the same as the process of How to Activate UAN Number, you just need to give your PF number instead of UAN Number.

What to do if my Date of Birth or Name is not Matching with UAN Data?

The best way to tackle this issue is to contact your employer and get the exact Name and Date of Birth they have provided to PF Dept. while filing your PF. Once you get the Name and Date of Birth as per PF data, follow the Online UAN Activation process described above with the Name and DOB provided by your employer. 

Whether it’s right or wrong, your primary goal should be Activation of UAN. After that, you can Change Basic Details online anytime.

Read Also:

The post How to Activate UAN Number? first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3cI9V8g
via IFTTT

Sunday, September 27, 2020

PMKISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना :

योजनेचे स्वरूप :

लघु व सीमांत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारने “प्रधान मंत्री किसन सन्मान निधि” या मध्यवर्ती योजनेस मान्यता दिली आहे. पी.एम.किसान ही योजना १.१२.२०१८ पासून चालू झाली असून. १०० टक्के केंद्र शासनाने राबवलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत केले जाणारे अर्थसहाय्य पूर्णपणे भारत सरकार करणार आहे.

या योजनेचा लाभ २ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या अल्पभूधारक तसेच अत्यल्भूधारक शेतकरी कुटुंबांना होणार असून प्रती वर्ष रू. ६०००/- उत्पन्न पाठबळ म्हणून देण्यात येणार आहे.

राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबांची ओळख/पडताळणी करतील जे या योजनेंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे.

दि.१.१२.२०१८ ते ३१.०३.२०२० या कालावधीचा पहिला हप्ता या आर्थिक वर्षामध्येच वितरीत केला जाणार आहे.

उद्देश आणि फायदे :

शेतीयोग्य जमीन असणाऱ्या सर्व लघु व सीमांत जमीनधारक शेतक-यांना मिळकत आधार देण्याच्या उद्देशाने ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

अपेक्षित शेतीच्या उत्पन्नाशी सुसंगत पिकांचे आरोग्य व योग्य उत्पादन मिळण्यासाठी विविध उपकरणांची खरेदी करण्यासाठी तसेच लहान शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी पत्रात निकष:

या योजनेअंतर्गत, सर्व लहान आणि इतरांना खालील प्रमाणे आर्थिक लाभ दिला जाईल.

देशभरातील किरकोळ शेतकरी कुटुंबे.

शेतकरी कुटुंबे ही एकूण 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रावर शेती करणारी असावीत.

वरील निकषांत बसणाऱ्या कुटुंबास वार्षिक 6000 रुपयांचा लाभ दिला जाईल. या रकमेचे हप्ते दर चार महिन्यांनी आपल्या आधार सोबत संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

PM KISAN YOJANA नोंदणी कशी करावी(HOW TO REGISTER FOR PMKISAN YOJANA):

  • प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाइटवर आल्यानंतर “Farmer Corner” ला क्लिक करा.
  • ड्रॉपडाऊन लिस्ट मधून “New Farmer Registration” पर्यायावर क्लिक करा.
  • आपला आधारकार्ड आणि सेक्युरिटी कोड प्रविष्ठ करून “click here to continue” वर क्लिक करा.
  • आता नोंदणी अर्ज स्क्रीनवर दिसून येईल.
  • आता उमेदवारांनी संबंधित फील्डमध्ये स्वत: चे सर्व आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे. आवश्यक तपशील भरल्यानंतर, शेतकऱ्यांनी पुढे जाण्यासाठी “Save” बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  • अश्याप्रकारे पंतप्रधान किसान योजनेसाठी आपली नोंदणी पूर्ण होईल.
अंतिम नोंदणी पूर्ण होताच शेतकरी उमेदवारांना त्यांनी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.
PM KISAN पीएम किसान योजना

लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव कसे तपासावे(HOW TO CHECK NAME IN BENEFICIARY LIST)?

  • प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाइटवर आल्यानंतर “Farmer Corner” ला क्लिक करा.
  • ड्रॉपडाऊन लिस्ट मधून “Beneficiary List” पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर “Beneficiaries list under PM Kisan” ह्या नावाची टॅब उघडेल होईल.
  • त्या मध्ये दिसणारे State, District, Sub-District, Block, Village हे पर्याय योग्य रितीने भरावेत.
  • सर्व पर्याय भरून “Get Report ” या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या गावातील लाभार्थींची यादी उघडेल. या यादीमध्ये आपण आपले नाव शोधू शकता.
  • अश्याप्रकारे आपल्याला आपलं नाव या यादीमध्ये तपासता येयू शकते.

लाभार्थी सद्यस्थिती कशी तपासावी(HOW TO CHECK BENEFICIARY STATUS)?

https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला लाभार्थी सद्यस्थिती हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्याला अनुक्रमे आधार क्रमांक(Aadhar Number), खाते क्रमांक(Account Number) आणि मोबाईल क्रमांक(Mobile Number) हे पर्याय दिसतील.

त्यातील आपल्याला सोयीचा असलेला पर्याय निवडून संबंधित पर्यायाचे तपशील द्यावे.

यानंतर Get Data या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेबद्दल पूर्ण माहिती मिळेल. तसेच काही अडचणी किंवा काही बाबींची पूर्तता करायची असल्यास त्याचीही माहिती मिळेल.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

READ ALSO:

The post PMKISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/30cg0Fg
via IFTTT

Tuesday, September 22, 2020

7/12 उतारा म्हणजे काय? कसा पाहावा?

आपण जर शेतकरी असाल तर 7/12 उताऱ्याची गरज आपल्याला नेहमीच पडत असेल. त्याचबरोबर कुठलीही शेतजमीन घ्यायची असल्यास आपण सगळ्यात आधी 7/12 उतारा पाहात असतो जेणेकरून आपल्याला संबंधित जमिनीची पूर्ण माहिती मिळते तसेच त्या जमिनीसंबंधी असलेल्या विविध कायदेशीर बाबी जसे की कर्ज, वारसदार यांचीही माहिती मिळते. 

बऱ्याच जणांना 7/12 Extract मध्ये कुठल्या बाबी उल्लेखलेल्या असतात तसेच त्या कुठे नमूद केलेल्या असतात हे माहित नसते. 

आज आपण अश्याच काही बाबींबद्दल जाणून घेणार आहोत. यात तुम्हाला पडलेल्या पुढील प्रश्नांचा समावेश आहे. 

  1. 7/12 उतारा म्हणजे काय (What is 7/12 Extract)?
  2. 7/12 उतारा कसा पाहावा/डाउनलोड करावा  (How to Read 7/12 वर Download 7/12 Extract)?
  3. 7/उतारा कसा वाचावा (How to Read 7/12 Extract)?
  4. 8 अ उतारा म्हणजे काय आणि तो कसा डाउनलोड करावा(What is 8A and How to Download it)?

7/12 उतारा म्हणजे काय (What is 7/12 Extract)?

थोडक्यात सांगायचे तर 7/12 उतारा म्हणजे तुमच्या शेत जमिनीची सरकार दरबारी नोंद असल्याचा पुरावा होय. यात संबंधित जमिनीच्या तुकड्याचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव, वारसदार तसेच जमिनीच्या प्रकाराबरोबरच त्या जमिनीत घेतली जाणारी पिके यांची माहिती नमूद केलेली असते. 

7/12 उतारा कसा पाहावा/डाउनलोड करावा (How to Read 7/12 or Download 7/12 Extract)?

7/12 उतारा कसा पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपण पुढील पद्धत वापरू शकता.

सर्वप्रथम इथे क्लिक करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या संकेतस्थळावर जा. 

हे संकेतस्थळ तुम्हाला अश्या प्रकारे दिसेल. 

यात आपला विभाग निवडा यानंतर आपला जिल्हा तालुका आणि आपले गाव निवडा. 

पुढे दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडा. शक्य असल्यास सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांक हा पर्याय निवडा आणि तो प्रविष्ट करा. तो नसल्यास आपण आपले नाव, मधले नाव किंवा आडनाव प्रविष्ट करू शकता पुढे शोधा या बटनावर क्लिक करा.

आपण प्रविष्ट केलेल्या माहितीशी मिळते जुळते सर्व्हे क्रमांक असलेल्या 7/12 उताऱ्यांची यादी आपल्याला दिसेल. यातील आपल्याला हवा असलेला उतारा निवडा. पुढे आपला मोबाईल क्रमांक देऊन 7/12 पहा या बटनावर क्लिक करा.

तुम्हाला समोर दिसणारा सातबारा उतारा डाउनलोड करायचा असल्यास तुम्ही प्रिंट कमांड वापरून सेव्ह ऍज पीडीएफ(Save As PDF) हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या फोल्डरमध्ये आपण हि फाईल सेव्ह करा.

7/12 उतारा कसा वाचावा

7/12 उतारा कसा वाचावा (How to Read 7/12 Extract)?

खालील चित्रामध्ये उतारा 7 दर्शविलेला आहे. यात लाल रंगाच्या चौकटीत दर्शवलेल्या भागात संबंधित भूखंडाची भौगोलिक माहिती दर्शवलेली असते. यावरून आपल्याला तो भूखंड कुठे आहे हे कळू शकेल. 

हिरव्या रंगाच्या चौकटीत संबंधित भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ तसेच त्यापैकी किती क्षेत्रफळ कोणत्या जमिनीच्या    प्रकारात मोडते याची माहिती मिळते.

निळ्या रंगाने दर्शवलेल्या चौकटीत संबंधित जागेच्या मालकांची/भोगवटाधारकांची आणि वारसदारांची नावे असतात. यात त्या त्या व्यक्तीच्या मालकीच्या हिस्स्याची माहिती दिलेली असते.

पिवळ्या रंगात दर्शविलेल्या चौकटीत खाते क्रमांक, कुळ असल्यास त्यांचे नाव आणि इतर अधिकार असलेल्या व्यक्ती/संस्थांचे नाव असते. 

उदा. वनजमीन असल्यास त्या जमिनीवर वहिवाट असलेल्या व्यक्तींची नावे तसेच कर्ज देणाऱ्या पतसंस्थांची नावे आणि त्या कर्जाची रक्कम.

यातील उतारा क्रमांक 12 मध्ये आपण सदर भूखंडात घेतल्या जाणाऱ्या पिकांबद्दल माहिती मिळवू शकतो. यात मागील तीन वर्षात घेतलेल्या रब्बी तसेच खरीप हंगामातील पिकांची माहिती नमूद केलेली मिळेल. 

‘8 अ’ उतारा म्हणजे काय आणि तो कसा डाउनलोड करावा(What is 8A Extract and How to Download it)?

8 अ उताऱ्यामध्ये आपल्या नवे असलेल्या खाते क्रमांकातील सर्व सातबाऱ्यांची थोडक्यात माहिती दिलेली असते जसे की त्या खाते क्रमांकात असलेले इतर खातेधारक, त्या खाते क्रमांकात नोंद असलेले इतर 7/12 उतारे आणि त्यांचे क्षेत्रफळ.

8 अ उतारा डाउनलोड करण्याची प्रक्रिया ही 7/12 उतारा डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेसारखीच असून फक्त त्यात सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक ऐवजी खाते क्रमांक द्यावा लागतो.

The post 7/12 उतारा म्हणजे काय? कसा पाहावा? first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3i0LjZL
via IFTTT

MUHS Recruitment 2020 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती (57 पदे)

MUHS Recruitment 2020 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती : विविध 57 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या 
1
प्राचार्य


आयुर्वेदातील पदवी
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
10 वर्षे अनुभव 
01
2 प्राध्यापक आयुर्वेदातील पदवी
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
10 वर्षे अनुभव 
13
3 सहयोगी प्राध्यापक आयुर्वेदातील पदवी
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
05 वर्षे अनुभव 
16
4 सहायक प्राध्यापक
आयुर्वेदातील पदवी
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी 
27
एकूण पदसंख्या 57
फी  :  फी नाही 
अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी पत्ता : The Chairman Shree Saptashrungi Ayurved, Mahavidyalay & Hospital, Nashik- 422003

ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती

The post MUHS Recruitment 2020 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती (57 पदे) first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3hMDUNm
via IFTTT

Saturday, September 19, 2020

तीन दिवसांत पी एफ? पूर्ण प्रक्रिया, समज आणि गैरसमज.

तुम्हाला तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ मधील काही किंवा पूर्ण रक्कम काढायची आहे?

तुम्हाला कुणीतरी तीन दिवसांत पीएफ काढता येतो म्हणून सांगितले आहे? किंवा तसे आश्वासन देऊन कमिशन लाटण्याचा प्रयत्न केला आहे?

मग हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण या लेखात आपण यु ए एन क्रमांक ऍक्टिव्ह करण्यापासून (UAN Activation) ते पैसे काढण्यापर्यंत (PF Claim) पूर्ण प्रक्रिया तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी यांची माहिती घेणार आहोत.

हा लेख पूर्ण वाचल्यावर तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपला पीएफ क्लेम करण्यासाठी किती वेळ लागू शकेल. त्यामुळे कोणत्याही खोट्या आश्वासनांना बळी पडण्यापासून तुम्ही वाचू शकाल.

प्रथमत: आपण पूर्ण प्रक्रिया थोडक्यात पाहूया त्यानंतर एक एक मुद्दा त्यातील अडचणींसह सविस्तरपणे पाहू.

  1. युएएन ऍक्टिव्हेशन(UAN Activation)
  2. पासवर्ड बदलणे(Change UAN PAssword)
  3. नाव/जन्म दिनांक बरोबर असल्याची खात्री करणे/बदलणे (Check/Change Name/Date of Birth)
  4. केवायसी(KYC)
  5. पीएफ सुरु केल्याची/सोडल्याची तारीख तपासणे.(Update Joining Date/Exit Date)
  6. पीएफ क्लेम (PF Claim)
  7. किती टक्के पैसे मिळतील?

1) युएएन ऍक्टिव्हेशन(UAN Activation)

पीएफ खात्याचा युएएन ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमचा पीएफ क्रमांक किंवा युएएन क्रमांक तुमच्या एच आर किंवा कंत्राटदाराकडून घ्यावा लागेल. या क्रमांकाबरोबर तुमच्याकडे एक मोबाईल क्रमांक तसेच तुमची जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे. 

येणाऱ्या अडचणी:

जर तुमच्या येऊ आर ने किंवा कंत्राटदाराने तुमचे पीएफ खाते तयार करताना तुमची जन्मतारीख चुकीची टाकली असेल तर तुमचा युएएन ऍक्टिव्हेट व्हायला अडचणी येउ शकतात. त्याचबरोबर तुमच्या खऱ्या नावात आणि पीएफ खात्यात असलेल्या नावात जर खूप जास्त फरक असेल तरी तुमचा युएएन ऍक्टिव्ह होऊ शकत नाही. 

ऍक्टिव्हेशनच्या वेळी विचारला गेलेला ओटीपी तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर येईल तो वेळेत देणे गरजेचे आहे. 

2) पासवर्ड बदलणे(Change UAN Password)

तुम्ही तुमचा युएएन ऍक्टिव्हेट केल्यावर तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस येईल ज्यात तुमच्या खात्याचा पासवर्ड असेल. हा पासवर्ड शक्यतो बदलावा व तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड ठेवावा. पासवर्डमध्ये किमान एक इंग्रजी कॅपिटल अक्षर, किमान एक लहान अक्षर तसेच किमान एक अंकासह एक तरी स्पेशल कॅरेक्टर(@#$%^&*!) असावे.

3) नाव/जन्म दिनांक बरोबर असल्याची खात्री करणे/बदलणे (Check/Change Name/Date of Birth)

बऱ्याचदा तुमच्या एम्प्लॉयरकडून तुमच्या पीएफ खात्यात तपशील टाकताना नावात किंवा जन्मतारखेत चुका असण्याची शक्यता असते. अश्या वेळी तुम्हाला तुमचे नाव किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज करावा लागू शकतो. काळजी नसावी, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायचे नसून फक्त आपल्या पीएफ अकाउंट मध्ये लॉगिन करून Manage मेन्यूमध्ये Basic Details या पर्यायाला निवडून तुमच्या आधार कार्ड क्रमांकाबरोबर तुमचे योग्य तपशील द्यायचे आहेत. 

येणाऱ्या अडचणी:

तुमचे आधार कार्ड वरील तपशील योग्य असणे गरजेचे आहे. ते बरोबर नसल्यास आधी ते बरोबर करून घेणे पुढील प्रक्रियेसाठी महत्वाचे आहे. 

तुमची खरी जन्मतारीख आणि पीएफ खात्यावरील जन्मतारीख यात जर एक वर्षापेक्षा जास्त फरक असेल तर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावा अपलोड करावा लागेल. यासाठी जन्माचा दाखल(Birth Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला(Leaving Certificate) आवश्यक आहे.

चूक सुधारण्यासाठी लागणारा कालावधी: 

तुमच्या एम्प्लॉयरने तुमच्या विनंतीला मान्यता(अप्रूव्हल) दिल्यानंतर पीएफ विभागाकडून एक ते चार दिवस लागू शकतात. कधीकधी हा कालावधी जास्तही असू शकतो. तुमच्या एम्प्लॉयरने लवकरात लवकर अप्रूव्हल देणे या बाबतीत फायदेशीर होऊ शकते.

4) केवायसी(KYC)

केवायसी साठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच एका बॅंकेचा खाते क्रमांक तसेच आयएफएससी (IFSC) कोड असणे आवश्यक आहे.

येणाऱ्या अडचणी: 

तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यावरील तुमचे नाव आणि जन्मतारीख सारखे असणे खूप महत्वाचे आहे. यात चुका असल्यास तुम्हाला त्यात आधीच सुधारणा करून घ्याव्या लागतील.  

पूर्ततेसाठी लागणारा कालावधी:

या प्रक्रियेलाही नाव/जन्मतारीख प्रमाणेच केवायसी साठीही तुमच्या एम्प्लॉयरचे अप्रूव्हल मिळणे आवश्यक असते. त्यामुळेच तुमच्या एम्प्लॉयरने लवकरात लवकर अप्रूव्हल दिल्यानंतर पीएफ विभागाकडून एक ते चार दिवस लागू शकतात. कधीकधी हा कालावधी जास्तही असू शकतो.

5) पीएफ सुरु केल्याची/सोडल्याची तारीख तपासणे.(Update Joining Date/Exit Date)

पीएफ खात्यातुन पैसे काढण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पीएफ जमा होणे चालू झाल्याची आणि तुम्ही काम सोडले असल्यास तुम्ही काम सोडल्याची तारीख अद्ययावत आहे कि नाही हे तपासणे. बऱ्याचदा या तारखा तुमच्या एम्प्लॉयरने अपडेट केलेल्या नसतील तर तुम्हाला पीएफ काढताना अडचणी येऊ शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरवर अवलंबून राहावे लागेल. 

पूर्ततेसाठी लागणारा कालावधी:

ही प्रक्रिया पूर्णपणे तुमच्या एम्प्लॉयरवर अवलंबून असल्याने त्यांनी तपशील भरले की लगेचच संबंधित तारखा अपडेट होतात. 

त्याचप्रमाणे जर तुम्ही काम सोडलेले असेल तर तुम्ही काम सोडलेल्या महिन्यानंतर दोन महिन्यांनी काम सोडल्याची तारीख(Exit Date) तुम्हाला अपडेट करता येते. यासाठी मात्र तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. 

6) पीएफ क्लेम (PF Claim)

वर दिलेल्या सगळ्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतरच तुम्ही पीएफ क्लेम करू शकाल. आणि या पायऱ्या पूर्ण होण्यासाठी  फक्त तीन दिवस लागणार नाहीत हेही तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे कुणाच्याही खोट्या आमिषांना बळी  न पडता योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सल्लागाराकडेच जा. 

क्लेम करण्यासाठी आवश्यक बाबी: 

अ) वरील सर्व पायऱ्या पूर्ण झालेल्या असाव्यात.

ब) आधार कार्डशी मोबाईल क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे. 

क) क्लेम करताना आलेला ओटीपी वेळेत भरणे आवश्यक आहे. 

ड) क्लेम करण्यासाठी बँक पासबुक किंवा चेक अपलोड करणे आवश्यक आहे.

पीएफ संबंधी आपल्या मनातील समज-गैरसमज या लेखातून काही प्रमाणात निश्चितच कमी झाले असतील.

तुम्हाला पीएफ क्लेमच्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती देणे हे या लेखाचे उद्दिष्ट असून आपल्या मनात आणखी काही शंका असल्यास आपण त्या कमेंट करू शकता. लवकरच आम्ही तुमच्यासाठी पूर्ण तपशीलवार लेख घेऊन येत आहोत त्या लेखात आपल्या शंकांचे निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.

-कल्पेश गावळे

इंस्टाग्रामफेसबुकईमेल

Read Also:

The post तीन दिवसांत पी एफ? पूर्ण प्रक्रिया, समज आणि गैरसमज. first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3kuUdQH
via IFTTT

Thursday, September 17, 2020

नोकरदार गृहिणी ते उद्योजक: एका मनस्विनीचा प्रवास!

नमस्कार, मी अनुजा अतुल राव. तसे तुम्ही नावाने कमी ओळखत असाल पण माझा चेहरा तुम्ही ओळखू शकाल कदाचित. एखाद्या उत्पादनाच्या, ब्रॅण्डच्या जाहिरातीत किंवा सोशल मीडीयावर नाहीतर क्वचित एखाद्या बातमीतही. कारण मी पूर्णवेळ शिक्षिका असली तरी एक मॉडेलही आहे आणि मॉडेलिंग, अभिनय तसेच जाहिरात क्षेत्रात काम करते. एका छोट्याश्या गावातील सामान्य घरातील मुलगी ते मॉडेल आणि आता उद्योजक हा माझा प्रवास मी आज तुमच्या समोर मांडणार आहे.

मी मध्यमवर्गीय वातावरणात लहानाची मोठी झाले. आई-वडिलांनी माझ्यासाठी शाळा, कॉलेज, नोकरी अशीच सर्वसाधारण चाकोरीबद्ध स्वप्ने बघितली  होती. पण माझा स्वभाव मुळातच महत्त्वाकांक्षी व जिद्दी असल्याने ही चाकोरी मोडून त्यापलीकडे काहीतरी करावं असं माझं स्वप्न होतं. यथावकाश शिक्षण पूर्ण करून शिक्षिका झाले. लग्न होऊन एका गोंडस मुलीची आईही झाले. मात्र मनाच्या कोपऱ्यात अजूनही ती स्वप्नं कुठेतरी साद घालत होती. स्वतःची वेगळी ओळख आणि एक वेगळे अस्तित्व असावे म्हणून मन ओढ घेत होते. 

मॉडेलिंग क्षेत्राचे मला पहिल्यापासूनच आकर्षण होते. या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी आपल्याकडे आहेत याची जाणीवही होती. मात्र मॉडेलिंग या क्षेत्राविषयी समाजात असणारे गैरसमज आणि या क्षेत्राकडे बघण्याचा चुकीचा दृष्टीकोन यामुळे या क्षेत्राच्या दिशेने माझे पहिले पाऊल थोडे उशिराच उचलले गेले. 

माझ्या प्रवासाची सुरुवात ‘’मनास्विनी मिसेस ठाणे -2016’’ च्या उपविजेते पदाने झाली. त्यानंतर मी Mrs.Tiara India -2017 व Mrs.India International-2017 सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि तेथेही नेत्रदीपक यश मिळवले. एक गृहिणी ते शिक्षिका आणि पुढे मॉडेल ते उद्योजिका हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. पण जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर मी ते साध्य करून दाखवले. 

ज्या स्पर्धेने माझा आत्मविश्वास प्रचंड वाढवला. ती स्पर्धा म्हणजे “मनस्विनी मिसेस ठाणे 2016”. त्या आधीच्या दोन सौंदर्यस्पर्धांमध्ये मला अपयश आले होते. पण निराश न होता मी 2016  मध्ये पुन्हा प्रयत्न केला व उपविजेते पद मिळवले. Mrs. Tiara India 2017 या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मी Mrs. Tiara India Galaxy 2017 हे टायटल जिंकले तसेच Best Walk आणि Best Sport Person ही सबटायटल्सही कमावली.

त्यानंतर मार्च 2017 मध्ये झालेल्या Mrs. India International 2017 या अंतरारराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेमध्ये Mrs. India Mumbai International हे टायटल जिंकले व फायनलिस्ट  होण्याचा सन्मान मिळवला.

सौंदर्यस्पधांच्या विजेतेपदांमुळे चेहऱ्याला एक ओळख मिळाली व आपसूकच विविध संधी चालून येऊ लागल्या.

आतापर्यंत मी (नापतोल) Naptol, स्टार प्रवाह (Star Pravah), झी टीव्ही (ZeeTV), बेस्ट डील (Best Deal) यासारख्या प्रथितयश चॅनल्ससाठी काम केले आहे. त्याचबरोबर, बिग बझार (Big Bazaar), एरॉल हेल्थ टॉनिक (Erol Health Tonic), फोर्टिस हॉस्पिटल (Fortis Hospital), यांच्यासाठीही प्रोमो शूट आणि प्रिंट शूट केले आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ तसेच ‘निर्मल’ यासारख्या उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटांत काम करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. याशिवाय मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक नामांकित ब्रँड्स साठी मी फोटोशूट केले आहे.

माझ्या मॉडेलिंग क्षेत्रातील पाच वर्षाच्या यशस्वी प्रवासात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मॉडेलिंग या क्षेत्राविषयी आपल्या समाजात खूप गैरसमज आहेत. एका वेगळ्याच नकारात्मक दृष्टिकोनातून या क्षेत्राकडे पहिले जाते. तसेच या क्षेत्रात येण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा अनेक खोट्या आमिषांना ते बळी पडतात. ही सर्व परिस्थिती विचारात घेता मी माझे या क्षेत्रातील ज्ञान या सर्वांपर्यंत पोचवण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात म्हणून मी माझे इंस्टाग्राम हँडल @anuja_atul तसेच @arventureofficial आणि ट्रेल या ऍप्प वर @inspirewithanuja वर मॉडेलिंग आणि ग्रूमिंग बरोबरच या क्षेत्रातील इतर विषयांवर माहितीपूर्ण व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अलीकडेच मी माझे युट्युब चॅनल Inspire With Anuja वर काम सुरु केले आहे. त्यावरही भविष्यात अधिक माहितीपूर्ण व्हिडीओज देण्याचा मानस आहे.  

AR Ventures ही माझी संस्था मॉडेलिंग आणि ऍक्टिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन टॅलेन्ट आणि फ्रेशर्सना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करते. AR Ventures या माझ्या कंपनीचे अनेक उत्कृष्ट बॅनर्ससोबत बरोबर टाय-अप झालेले आहे. त्यामुळे नवोदितांना योग्य मार्गदर्शनाबरोबरच उत्तम संधीही आम्ही मिळवून देतो. 

हे क्षेत्रच प्रचंड आकर्षक आणि ग्लॅमरस असल्याने कायम प्रेझेंटेबल राहणं हे आवश्यक असते. आणि त्यासाठी मी नित्यनेमाने योगासने, डाएट आणि योग्य व्यायामावर लक्ष देते. तसंच गृहिणी, मॉडेल, शिक्षिका आणि एक उद्योजिका या साऱ्या भूमिका यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी शरीराचे आणि मनाचे योग्य संतुलन राखणेही गरजेचे होते. केवळ शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्याही फिट राहणे गरजेचे होते. नियमित वाचन, ध्यानधारणा, योग, आहार आणि व्यायाम यांच्या मदतीने मी स्वतःचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न करते.

इथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही चाकोरी सोडून एखाद्या क्षेत्रात नाव कमविण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला प्रचंड नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागते. तुमच्या इच्छाशक्तीच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हाला या सर्वांवर मात करावी लागते. आपला प्रत्यक्ष निर्णय बरोबरच ठरेल असे नसते. पण तुमच्या कार्यक्षमतेवर आणि ज्ञानावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही अपयशावरही नक्की मात करू शकता. 

जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत असता तेव्हा एखादे छोटे अपयशही तुम्हाला निराशेच्या खोल गर्तेत ढकलू शकते. जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा माझ्या कुटुंबाने मला प्रचंड सपोर्ट केलेला आहे. माझे पती, मुलगी आणि आई वडील ही माझी सपोर्ट सिस्टम आहेत. माझे सासरे आणि वाहिनी हे नेहमी मला नवीन उमेद देऊन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. ‘We are proud of you’ हे शब्द मला नेहमी उमेद आणि शक्ती देत असतात. 

माझे शिक्षक, मित्र तसेच मॉडेलिंग क्षेत्रातील अनेक मित्र व मार्गदर्शकही मला सतत सहकार्य करत असतात. त्यांचा प्रोत्साहनामुळेच मी एवढे मोठे पाऊल उचलण्याचे धाडस करू शकले.

माझ्या मते प्रत्येक स्त्री ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असायला हवी. गरज असते ती तिला तिच्या गुणांची जाणीव करून देण्याची. घरातल्या जबाबदाऱ्या स्त्रिया यशस्वीपणे पार पाडत असतात. पण त्याच बरोबर स्वतःचे एक वेगळे अस्तित्व असायला हवे याची जाणीव स्त्रीला होणे गरजेचे आहे. कारण प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून बहुतांश वेळा त्या ही गोष्ट विसरतात.

मॉडेल झाले तरी आपण एक शिक्षिका आहोत याचे भान नेहमी ठेवावे लागते. आपल्या कृतीतून किंवा वक्तव्यातून समाजाला कोणताही चुकीचा संदेश जाणार नाही याची मी कायम दक्षता घेते. 

एक यशस्वी स्त्री असले तरीही मी माझे शिक्षण थांबवले नाही. मी MA, BEd, MPhil पूर्ण केलेले आहे आणि सध्या पुणे विद्यापीठातून PhD करत आहे. सतत नवीन शिकत राहिल्याने तुमच्या व्यक्तिमत्वातील तजेला टिकून राहातो असे मला वाटते. अर्थात हे शिक्षण आपापल्या आवडी आणि क्षेत्रानुसार वेगळे असू शकते.   

वाचन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आजची तरुणाई विसरतेय. सोशल मिडियाच्या प्रचंड भडीमारात तरुण भरकटलेले दिसतात. तुम्हाला जर कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर इतर यशस्वी व्यक्तींच्या सहवासात असणे फार गरजेचे आहे. आणि हा सहवास तुम्हाला पुस्तके मिळवून देतात असे मला मनापासून वाटते. आणि हे मीच नाही तर प्रत्येक यशस्वी व्यक्ती तुम्हाला सांगेल. तरुणी आणि स्त्रियांनी तर नक्कीच वाचनाची सवय लावून घ्यायला हवी असे मला वाटते.

स्वतःची स्वप्ने आणि इच्छा यांकडे ‘जग काय म्हणेल’ म्हणत दुर्लक्ष करून माघार घेण्यापेक्षा स्वतःला त्या दृष्टीने प्रेरित करा, तयारी करा आणि कामाला लागा. 

तुम्हाला यशाच्या दिशेने नेण्याची क्षमता एकच व्यक्तीमध्ये आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘तुम्ही स्वत:’

‘Self motivation is the best motivation!’

-अनुजा राव

संस्थापक, ए. आर. व्हेंचर्स.

फेसबुकइंस्टाग्रामयुट्युबट्रेल | वेबसाईट

Read Also:

The post नोकरदार गृहिणी ते उद्योजक: एका मनस्विनीचा प्रवास! first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/35Md4Cv
via IFTTT

Tuesday, September 15, 2020

ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती

ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती : विविध 141 रिक्त पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 सायंटिस्ट-B
Scientist
MBBS पदवी किंवा बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीवशास्त्र / जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, समाज कार्य, अन्न आणि पोषण, जीवशास्त्र / सांख्यिकी, बायोइन्फॉरमॅटिक्स प्रथम श्रेणी पदवी किंवा द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी+Ph.D. 141 02 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 35 वर्षे
एकूण पदसंख्या 141
फी : General/OBC : 1500/-  SC/ST/EWS/महिला : 1200/- PWD : फी नाही
अंतिम दिनांक : 02 ऑक्टोबर 2020 (11:59 PM) 
परीक्षा (Online) : 01 नोव्हेंबर 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

Bank of India Recruitment 2020 बँक ऑफ इंडिया भरती

The post ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3ki2MhE
via IFTTT

Bank of India Recruitment 2020 बँक ऑफ इंडिया भरती

Bank of India Recruitment 2020 बँक ऑफ इंडिया भरती : विविध 214 रिक्त पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या 
1 इकोनॉमिस्ट SMGS-IV
अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी/Ph.D
07/05 वर्षे अनुभव
02
2 इकोनॉमिस्ट MMGS-II अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी
04 वर्षे अनुभव
02
3 सांख्यिकीविज्ञानी MMGS-II
सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी
04 वर्षे अनुभव
02
4 रिस्क मॅनेजर SMGS-IV
रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र+ 05 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/फायनान्स पदव्युत्तर पदवी+08 वर्षे अनुभव  03
5 रिस्क मॅनेजर MMGS-III रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र CA / ICWA
03 वर्षे अनुभव 
06
6 क्रेडिट ॲनालिस्ट SMGS-IV MBA/PGDM (फायनान्स) /CA/ICWA
10 वर्षे अनुभव
60
7 क्रेडिट ऑफिसर JMGS-I
कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS 79
8 (फिनटेक) IT SMGS-IV
B.E./ B. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा कोणतीही पदवीधर DOEACC सोसायटीच्या ‘B’ पातळीच्या पात्रतेसह
08 वर्षे अनुभव
03
9 IT (फिनटेक) MMGS-III
B.E./ B. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा कोणतीही पदवीधर DOEACC सोसायटीच्या ‘B’ पातळीच्या पात्रतेसह.
05 वर्षे अनुभव
10
10 IT (फिनटेक) MMGS-II
B.E./ B. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा कोणतीही पदवीधर DOEACC सोसायटीच्या ‘B’ पातळीच्या पात्रतेसह.
03 वर्षे अनुभव   
13
11 IT (डाटा सायंटिस्ट) SMGS-IV सांख्यिकी, कॉम्पुटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग मधील पदव्युत्तर पदवी/Ph.D
08  वर्षे अनुभव
03
12 IT (डाटा ॲनालिस्ट) MMGS-III B.E./ B. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणिइलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा MCA/ MBA (Business Analytics)/ PG (Statistics)
05 वर्षे अनुभव
03
13 IT (डाटा ॲनालिस्ट) MMGS-II B.E./ B. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA/ MBA (बिजनेस ॲनालिटिक्स )/ PG (सांख्यिकी)
03 वर्षे अनुभव
06
14 IT (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी) SMGS -IV IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी
08 वर्षे अनुभव
02
15 T (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी) MMGS-III IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी
05 वर्षे अनुभव
02
16 इन्फॉर्मेशन सिक्योरिटी
IT
MMGS-II
IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी
03  वर्षे अनुभव
04
17 टेक अप्रैझल MMGS-II इन्फ्रास्ट्रक्चर / पॉवर प्लांट / पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन सिस्टम / मेटलर्जिकल / मटेरियल सायन्स / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / टेक्सटाईल / फार्मसी / फार्मास्युटिकल / सेमीकंडक्टर्स / ऑइल आणि गॅस  / केमिकल / प्लास्टिक / पॉलिमर इंडस्ट्रियल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी
03 वर्षे अनुभव
10
एकूण पदसंख्या 214

वयोमर्यादा :

  • 1, 4, 6 ,8, 11 आणि 14 : 20 ते 38 वर्षे
  • 2, 3, 5, 9, 12, 15, आणि 17: 20 ते 35 वर्षे
  • 7 : 20 ते 30 वर्षे
  • 10, 13 आणि 16 : 20 ते 32 वर्षे
फी : General/OBC : 850/-  SC/ST/PWD : 175/-
अंतिम दिनांक : 30.09.2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

UPSC Recruitment 2020 केंद्रीय लोकसेवा आयोग भरती

The post Bank of India Recruitment 2020 बँक ऑफ इंडिया भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2ZFOIqf
via IFTTT

Saturday, September 12, 2020

Western Railway Recruitment पश्चिम रेल्वे भरती 2020

Western Railway Recruitment पश्चिम रेल्वे भरती 2020 विविध 20 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 नर्सिंग सुपरिटेंडेंट
GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3 अनुभव
16 20 ते 40 वर्षे
2 क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट MBBS  
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव 
04 18 ते 33 वर्षे
फी : फी नाही 
अंतिम दिनांक : 17 सप्टेंबर 2020 
मुलाखत (online): 19 सप्टेंबर 2020 
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

Western Railway Recruitment पश्चिम रेल्वे भरती 2020 विविध 41 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज 24 जुलै पासून ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 कनिष्ठ तांत्रिक सहकारी (कार्य)
Jr. Tech Assoc (Works)
मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून  सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षे पदविका किंवा सिव्हिलमध्ये B.Sc/ सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा 19 22.07. 2020 रोजी 18 ते 33 वर्षे.
2 कनिष्ठ तांत्रिक सहकारी (विद्युत)
Jr. Tech Assoc (Elect.) 
मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्समध्ये तीन वर्षांचा डिप्लोमाअभियांत्रिकी किंवामेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये चार वर्षे पदवीधर पदवी 12 22.07. 2020 रोजी 18 ते 33 वर्षे.
3 कनिष्ठ तांत्रिक सहकारी
 (टेली/S & T)
Jr. Tech Assoc (Tele/S&T)  
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनीक्स / तंत्रज्ञान / संप्रेषण अभियांत्रिकी / संगणक विज्ञान आणिअभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी माहिती मध्ये तीन वर्षे डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनीक्स /माहिती तंत्रज्ञान / संचार अभियांत्रिकी मध्ये चार वर्षे पदवीधर पदवी 10 22.07. 2020 रोजी 18 ते 33 वर्षे.
अंतिम दिनांक : 22 ऑगस्ट 2020 (09:00 PM)
वेबसाईट : येथे क्लिक करा 
Western Railway Recruitment जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
फी  : General/OBC: 500/-   SC/ST/OBC/EWS/अल्पसंख्याक/महिला :250/-


Bharat Electronics Recruitment भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती 2020

The post Western Railway Recruitment पश्चिम रेल्वे भरती 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2RksCVQ
via IFTTT

UPSC Recruitment 2020 केंद्रीय लोकसेवा आयोग भरती

UPSC Recruitment 2020 केंद्रीय लोकसेवा आयोग भरती : विविध 204 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 पशुधन अधिकारी
Livestock Officer
पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन विषयात पदवी 
03 वर्षे अनुभव
03 35 वर्षांपर्यंत 
2 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर Anaesthesiology MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव 
62 40 वर्षांपर्यंत 
3 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर Epidemiology MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव
 
01 40 वर्षांपर्यंत 
4 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर General Surgery
MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव
54 40 वर्षांपर्यंत 
5 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर
Microbiology or Bacteriology
MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव
15 40 वर्षांपर्यंत 
6 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर
Nephrology
MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव
12 40 वर्षांपर्यंत 
7 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर
Pathology
MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव
17 40 वर्षांपर्यंत 
8 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर
Paediatric Nephrology
MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव
03 40 वर्षांपर्यंत 
9 स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर Pharmacology
MBBS
संबंधित  विषयात विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव
11 40 वर्षांपर्यंत 
10 सहाय्यक संचालक जनगणना ऑपरेशन्स टेक्निकल
Assistant DirectorCensus Operations
सांख्यिकी/ऑपरेशन रिसर्च / गणित (सांख्यिकीसह) / अर्थशास्त्र (सांख्यिकीसह)/ वाणिज्य (सांख्यिकीसह) /मानवशास्त्र (सांख्यिकीसह) / समाजशास्त्र (सांख्यिकीसह)/लोकसंख्याशास्त्र (सांख्यिकीसह) मध्ये पदव्युत्तर पदवी
03 वर्षे अनुभव 
25 35 वर्षांपर्यंत 
11 असिस्टंट इंजिनिअर
Assistant Engineer
ड्रिलिंग/मायनिंग/मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल/पेट्रोलियम टेक्नोलॉजी या विषयात पदवी
01 वर्ष अनुभव
01 35 वर्षांपर्यंत 
एकूण पदसंख्या 204
फी : General/OBC/EWS : 25/- SC/ST/PH/महिला:फी नाही
अंतिम दिनांक : 01 ऑक्टोबर 2020  (11:59 PM)
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

PNB Recruitment 2020 पंजाब नॅशनल बँकेत भरती

The post UPSC Recruitment 2020 केंद्रीय लोकसेवा आयोग भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2FmgYaA
via IFTTT

Wednesday, September 9, 2020

Refurbished Products रिफर्बिश्ड म्हणजे काय?

आपण बऱ्याचदा टीव्ही किंवा इतर मीडियावर रिफर्बिश्ड उत्पादनांच्या जाहिराती बघत असतो. काही विक्रेते याला Renowened म्हणून सुद्धा विकतात. पण बऱ्याचदा रिफर्बिश्ड उत्पादने घेण्याबाबत आपल्या मनात शंका असतात.

याचे मूळ कारण की रिफर्बिश्ड आणि जुने/वापरलेली वस्तू यातील फरक आपल्याला नीटसा माहित नसतो तसेच यावर वॉरंटी किती आणि कश्या स्वरूपाची मिळेल याबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात.

आज आपण याच प्रशनांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

उत्पादने रिफर्बिश्ड म्हणून का विकली जातात?

हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो की ‘नव्यासारखे’ असलेले एखादे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी किमतीत का विकले जाते?

यासाठी आपण एक उदाहरण पाहुयात. समजा, तुम्ही एखाद्या ब्रॅण्डचा लॅपटॉप ऑनलाईन विकत घेतलात. डिलिव्हरीनंतर जेव्हा तुम्ही तो वापरण्यास सुरुवात केली तेव्हा तुमच्या लक्षात आले की त्याचा वेबकॅम नीट चालत नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ कॉल सारख्या कामांमध्ये अडचण येते. अशावेळी तुम्ही संबंधित इ-कॉमर्स वेबसाईटवर तो लॅपटॉप बदलण्यासाठी(Replace) किंवा तुमची पूर्ण ऑर्डर रद्द करून तो लॅपटॉप परत करण्यासाठी कंपनीकडे दावा केलात. या परिस्थितीमध्ये तुम्ही परत केलेला लॅपटॉप हा त्याचा वेबकॅम बदलून पुन्हा ‘नवीन’ म्हणून न विकता ‘रिफर्बिश्ड’ म्हणून विकला जाईल. याच कारणाने बऱ्याचदा रिफर्बिश्ड म्हणून विकलेली उत्पादने खूप कमी वापरलेली किंवा जराही न वापरलेली असतात.

मोठे ब्रॅण्ड्स हे आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोर नियम पाळतात त्यामुळे बऱ्याचदा त्यांना वाहतुकीदरम्यान आलेले ओरखडे सुद्धा एखादे उत्पादन रिफर्बिश्ड म्हणून विकावे लागते. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला रिफर्बिश्ड उत्पादने इतक्या चांगल्या स्थितीत असूनही कमी किमतीत विकली जातात.

रिफर्बिश्ड उत्पादनांमध्येही ब्रँड रिफर्बिश्ड(Brand Refurbished) बरोबरच, ओपन बॉक्सOpen Box) तसेच लाईक न्यू(Like New) प्रकरची उत्पादनेही मिळतात, त्याबद्दल आणखी माहिती घेऊ.

Read Also: https://ift.tt/3lgnv6R

ब्रँड रिफर्बिश्ड(Brand Refurbished)

या प्रकारातील उत्पादने ही त्यांच्या उत्पादकानेच दुरुस्त करून विक्री केलेली असते. बऱ्याचदा यांची किंमत इतर रिफर्बिश्ड उत्पादनांपेक्षा थोडी जास्त असू शकते.

ओपन बॉक्स(Open Box)

या प्रकारातील उत्पादन हे बऱ्याचदा ना वापरलेले असते. ग्राहकाने काही कारणास्तव परत केलेली उत्पादने या प्रकारात विकली जातात. बऱ्याचदा फक्त आऊटडेटेड झालेली उत्पादनेही या प्रकारात विकली जातात जी वापरलेली नसतात.

लाईक न्यू(Like New)

अगदी क्षुल्लक दुरुस्ती केलेली, बाहेरून कुठेलेही ओखडे किंवा इतर खुणा नसलेली उत्पादने तुम्हाला ‘नव्यासारखी’ म्हणून विकली जातात.

Read Also: https://ift.tt/2Pe9CHn

रिफर्बिश्ड आणि वापरलेल्या उत्पादनातील फरक (Refurbished vs Preowned)

रिफर्बिश्ड आणि वापरलेल्या उत्पादनातील मूळ फरक हाच आहे की रिफर्बिश्ड उत्पादने ही जुन्या/वापरलेल्या उत्पादनांपेक्षा कमी वापरलेली आणि चांगल्या स्थितीत असतात. जुन्या/वापरलेल्या वस्तू या जश्या आहे तश्या स्वरूपात आपल्याला विकत घ्याव्या लागतात याउलट रिफर्बिश्ड वस्तू या जाणकार टेक्निशियन्सद्वारे दुरुस्त केलेल्या असतात किंवा त्यांचे खराब भाग बदललेले असतात. त्याच बरोबर जुन्या/वापरलेल्या उत्पादनांवर तुम्हाला वॉरंटी मिळण्याची शक्यता जरा कमी असते.

बरेचसे ब्रँड्स हे त्यांची उत्पादने स्वतः दुरुस्ती करून विकत असतात त्यामुळे तुम्हाला ब्रँड वॉरंटी मिळू शकते.

रिफर्बिश्ड उत्पादने ही शक्यतो ‘जुन्या/वापरलेल्या’ वस्तूंपेक्षा अलीकडच्या काळात बाजारात आलेल्या असतात त्यामुळे आपल्याला तुलनेने नवे तंत्रज्ञान मिळते.

रिफर्बिश्ड उत्पादने घेताना घ्यायची काळजी

रिफर्बिश्ड उत्पादने घ्यायची असल्यास ब्रँडेड घ्यावीत.

वॉरंटी बद्दल नीट माहिती घ्यावी.

ब्रँड रिफर्बिश्ड मॉडेल मिळत असल्यास उत्तम, अर्थात हे थोडेसे महाग असू शकते.

रिफर्बिश्ड उत्पादने घ्यायची असल्यास वेबसाईट्स 2Gud , SSK Computer, Amazon

The post Refurbished Products रिफर्बिश्ड म्हणजे काय? first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/32cTRrr
via IFTTT

Tuesday, September 8, 2020

PNB Recruitment 2020 पंजाब नॅशनल बँकेत भरती

PNB Recruitment 2020 पंजाब नॅशनल बँकेत भरती : विविध 535 रिक्त पदांसाठी अर्ज सुरु झाले असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

Punjab National Bank, India’s first Swadeshi Bank, commenced its operations on April 12, 1895, from Lahore, with an authorized capital of Rs 2 lac and working capital of Rs 20,000. The Bank was established by the spirit of nationalism and was the first bank
purely managed by Indians with Indian Capital. During the long history of the Bank,9 banks have been merged with PNB. The financial year 2019- 20 was significant in view of the announcement of amalgamation of Public sector Banks wherein Oriental Bank of Commerce and United Bank of India amalgamated with Punjab National Bank with effect from April 1, 2020

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 मॅनेजर
रिस्क
60% गुणांसह गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा FRM/ PRM/ DTIRM/ MBA (फायनान्स)/CA/ ICWA/ CFA/ PGPBF
01 वर्ष अनुभव
160 25 ते 35 वर्षे
2 मॅनेजर
क्रेडिट
60% गुणांसह CA/ICWA/MBA/PGDM किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा
01 वर्ष अनुभव 
230 25 ते 35 वर्षे
3 मॅनेजर
ट्रेझरी
60% गुणांसह MBA (फायनान्स)/CA/ ICWA/CFA/CAIIB/ट्रेझरी मॅनेजमेंट डिप्लोमा/PGPBF
01 वर्ष अनुभव 
30 25 ते 35 वर्षे
4 मॅनेजर
लॉ
60% गुणांसह विधी (लॉ) पदवी
02 वर्षे अनुभव
25 25 ते 35 वर्षे
5 मॅनेजर आर्किटेक्ट 60% गुणांसह आर्किटेक्चर पदवी
Auto CAD
01 वर्ष अनुभव
02 25 ते 35 वर्षे
6 मॅनेजर
सिव्हिल
60% गुणांसह B.E./ B.Tech (सिव्हिल)
01 वर्ष अनुभव
08 25 ते 35 वर्षे
7 मॅनेजर 
इकॉनॉमिक्स
60% गुणांसह पर्सनल मॅनेजमेंट/इंडस्ट्रियल रिलेशन/HR/HRD/HRM/लेबर लॉ पदव्युत्तर  10 25 ते 35 वर्षे
8 मॅनेजर (HR)  60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पद
02 वर्षे अनुभव
10 25 ते 35 वर्षे
9 सिनियर मॅनेजर (रिस्क) 60% गुणांसह गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा FRM/ PRM/ DTIRM/ MBA (फायनान्स)/CA/ ICWA/ CFA/ PGPBF
03 वर्षे अनुभव
40 25 ते 37 वर्षे
10 सिनियर मॅनेजर (क्रेडिट) 60% गुणांसह CA/ICWA/MBA/PGDM किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
03 वर्षे अनुभव 
50 25 ते 37 वर्षे
एकूण पदसंख्या 535
फी : General/OBC : 850/-  SC/ST/PWD : 175/-
अंतिम दिनांक : 29 सप्टेंबर 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 


BIS Recruitment 2020 भारतीय मानक ब्यूरो भरती

The post PNB Recruitment 2020 पंजाब नॅशनल बँकेत भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/329bw3y
via IFTTT