Sunday, September 27, 2020

PMKISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना :

योजनेचे स्वरूप :

लघु व सीमांत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारने “प्रधान मंत्री किसन सन्मान निधि” या मध्यवर्ती योजनेस मान्यता दिली आहे. पी.एम.किसान ही योजना १.१२.२०१८ पासून चालू झाली असून. १०० टक्के केंद्र शासनाने राबवलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत केले जाणारे अर्थसहाय्य पूर्णपणे भारत सरकार करणार आहे.

या योजनेचा लाभ २ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या अल्पभूधारक तसेच अत्यल्भूधारक शेतकरी कुटुंबांना होणार असून प्रती वर्ष रू. ६०००/- उत्पन्न पाठबळ म्हणून देण्यात येणार आहे.

राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबांची ओळख/पडताळणी करतील जे या योजनेंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे.

दि.१.१२.२०१८ ते ३१.०३.२०२० या कालावधीचा पहिला हप्ता या आर्थिक वर्षामध्येच वितरीत केला जाणार आहे.

उद्देश आणि फायदे :

शेतीयोग्य जमीन असणाऱ्या सर्व लघु व सीमांत जमीनधारक शेतक-यांना मिळकत आधार देण्याच्या उद्देशाने ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

अपेक्षित शेतीच्या उत्पन्नाशी सुसंगत पिकांचे आरोग्य व योग्य उत्पादन मिळण्यासाठी विविध उपकरणांची खरेदी करण्यासाठी तसेच लहान शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी पत्रात निकष:

या योजनेअंतर्गत, सर्व लहान आणि इतरांना खालील प्रमाणे आर्थिक लाभ दिला जाईल.

देशभरातील किरकोळ शेतकरी कुटुंबे.

शेतकरी कुटुंबे ही एकूण 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रावर शेती करणारी असावीत.

वरील निकषांत बसणाऱ्या कुटुंबास वार्षिक 6000 रुपयांचा लाभ दिला जाईल. या रकमेचे हप्ते दर चार महिन्यांनी आपल्या आधार सोबत संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

PM KISAN YOJANA नोंदणी कशी करावी(HOW TO REGISTER FOR PMKISAN YOJANA):

  • प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाइटवर आल्यानंतर “Farmer Corner” ला क्लिक करा.
  • ड्रॉपडाऊन लिस्ट मधून “New Farmer Registration” पर्यायावर क्लिक करा.
  • आपला आधारकार्ड आणि सेक्युरिटी कोड प्रविष्ठ करून “click here to continue” वर क्लिक करा.
  • आता नोंदणी अर्ज स्क्रीनवर दिसून येईल.
  • आता उमेदवारांनी संबंधित फील्डमध्ये स्वत: चे सर्व आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे. आवश्यक तपशील भरल्यानंतर, शेतकऱ्यांनी पुढे जाण्यासाठी “Save” बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  • अश्याप्रकारे पंतप्रधान किसान योजनेसाठी आपली नोंदणी पूर्ण होईल.
अंतिम नोंदणी पूर्ण होताच शेतकरी उमेदवारांना त्यांनी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.
PM KISAN पीएम किसान योजना

लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव कसे तपासावे(HOW TO CHECK NAME IN BENEFICIARY LIST)?

  • प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाइटवर आल्यानंतर “Farmer Corner” ला क्लिक करा.
  • ड्रॉपडाऊन लिस्ट मधून “Beneficiary List” पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर “Beneficiaries list under PM Kisan” ह्या नावाची टॅब उघडेल होईल.
  • त्या मध्ये दिसणारे State, District, Sub-District, Block, Village हे पर्याय योग्य रितीने भरावेत.
  • सर्व पर्याय भरून “Get Report ” या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या गावातील लाभार्थींची यादी उघडेल. या यादीमध्ये आपण आपले नाव शोधू शकता.
  • अश्याप्रकारे आपल्याला आपलं नाव या यादीमध्ये तपासता येयू शकते.

लाभार्थी सद्यस्थिती कशी तपासावी(HOW TO CHECK BENEFICIARY STATUS)?

https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला लाभार्थी सद्यस्थिती हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्याला अनुक्रमे आधार क्रमांक(Aadhar Number), खाते क्रमांक(Account Number) आणि मोबाईल क्रमांक(Mobile Number) हे पर्याय दिसतील.

त्यातील आपल्याला सोयीचा असलेला पर्याय निवडून संबंधित पर्यायाचे तपशील द्यावे.

यानंतर Get Data या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेबद्दल पूर्ण माहिती मिळेल. तसेच काही अडचणी किंवा काही बाबींची पूर्तता करायची असल्यास त्याचीही माहिती मिळेल.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

READ ALSO:

The post PMKISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/30cg0Fg
via IFTTT

No comments:

Post a Comment